शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

गांधींची अहिंसा म्हणजे आत्मनिर्भरता व माणसे जोडणारे तत्व – युवकांचा एकमुखी उच्चार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:03 IST

गांधींची अहिंसा म्हणजे आत्मनिर्भरता व माणसे जोडणारे तत्व असा उच्चार युवकांनी एका टॉक शो मधे केला. 

ठळक मुद्देगांधींची अहिंसा म्हणजे आत्मनिर्भरता व माणसे जोडणारे तत्व – युवकांचा एकमुखी उच्चार!गांधींना विकास विरोधी मानणे चुकीचे आहे!अहिंसा म्हणजे शस्त्राला मारणारे शास्त्र! – प्रा. अशोक बागवे

ठाणे : गांधीजींचे अहिंसेचे तत्व हे भित्रेपणाला जन्म देणारे नसून आत्मनिर्भरता जागवून माणसे जोडणारे होते. पारतंत्र्याच्या काळात होणार्‍या अत्याचारांचा सामना हिंसेने झाला पाहिजे या जगभर रूढ असलेल्या समजाला छेद देऊन अहिंसेचा पुरस्कार करणे हे गांधीजींचे अद्वितीयपण आहे. सामान्य गरीब निर्बल लोकांना बलशाली, अहंकारी, वर्चस्ववादी सत्तेविरुद्ध लढण्यासाठी अहिंसेचे,सत्याग्रहाचे तत्वज्ञान हे आत्मविश्वास जागवणारे मोठे आयुध होते. हिंसेने हिंसेला उत्तर दिल्याने सर्वनाशच होऊ शकतो, ही तत्वे, हा विचार आजच्या परिस्थितीलाही तंतोतंत लागू पडतो! गांधींनी सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुतेचा सतत पुरस्कार केला. त्यामागे आपल्या विविध धर्म, जाती, पंथ यांनी गजबजलेल्या देशात सर्वांना आपले विचार मांडण्यासाठी, आचारांचे पालन करण्यासाठी समान स्पेस उपलब्ध व्हावी आणि देशात सलोखा राहावा हाच हेतु होता! आज देशात सांप्रदायिकता वाढीस लागलेली दिसत असतांना गांधीजींच्या या विचारांचे महत्व अधोरेखित होते, अशा शब्दात युवक युवतींनी 'महात्मा गांधीजींचं करायचं काय!' या टॉक शो मध्ये आपले विचार व्यक्त केले. दहशतवादाला संपवण्यासाठी दहशतवादींना गोळ्या घालण्यापेक्षा त्यांच्या मनातल्या दहशतवादाला मारले पाहिजे, असेही मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. 

            महात्मा गांधी पुण्यतिथीच्या दिवशी १५० व्या गांधी जयंतीच्या  वर्षाचे औचित्य साधून समता विचार प्रसारक संस्थेने हा युवा टॉक शो आयोजित केला होता. श्रोत्यांमध्ये मध्ये मोठ्या संख्येने महाविद्यालयीन युवा सहभागी झाले होते. वैष्णवी लोखंडे, गौरव आगळे, जिनाली कासार, सोनाली गोठल, मिहिर जाधव, राज खंडागळे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आणि प्रवीण खैरालिया, वैशाली सावंत - पाटील, संजय निवंगुणे या एकलव्य विद्यार्थ्यांनी मंचावरील चर्चेत भाग घेतला. चर्चेचे सूत्र संचालन संस्थेचे अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केले. या वेळी सुप्रसिद्ध कवी प्रा. अशोक बागवे, लेखिका वासंती वर्तक, लघुपटकार व पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर, ‘तलाव’अभियानाचे मयूरेश भडसावळे, कवयित्रि वृषाली विनायक आणि अमेय संस्थेच्या नंदिनी बर्वे या मान्यवरांनीही चर्चेत भाग घेतला.

गांधींना विकास विरोधी मानणे चुकीचे आहे!

             गांधी आणि तंत्रज्ञान या मुद्द्यावर चर्चा करताना युवांनी ठामपणे संगितले की, गांधी तत्वज्ञान - विरोधी, विकास - विरोधी नव्हते. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, हा त्यांचा आग्रह त्यांच्या ’खेड्याकडे चला’ या आवाहनामागे होता. तंत्रज्ञान हे आपल्या अफाट लोकसंख्येच्या देशातील लोकांना कार्यशील करणारे हवे, कार्यहीन करणारे नको असे त्यांचे म्हणणे होते. आज तंत्रज्ञानाचा अतिरेक होत असतांना बेरोजगारी बेसुमार वाढली आहे, अशा वेळी गांधीजींच्या द्रष्टेपणाचा आदर वाटतो. आज इंटरनेटवर अमर्याद उपलब्ध असलेल्या माहिती ज्ञानाला गांधीजींनी सांगितलेल्या बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो या त्रिसूत्रीचा फिल्टर लावूनच तिचा उपयोग केला पाहिजे. गांधीजींचा साधेपणा, वेळेबद्दलचा आग्रह, प्रत्येक गोष्ट स्वतः करून मग शिकवणे, मी पणा न बाळगता आम्ही पणा जपवून स्वातंत्र्य लढ्यात सामान्य स्त्री पुरूषांना सहभागी करून घेणे या गांधी विचारांबद्दल विद्यार्थी भरभरून बोलत होते. गांधींमुळे फाळणी झाली, या टीकेवरही विद्यार्थ्यांनी असहमती दर्शवून गांधींनी फाळणीला विरोधच केला होता हे आवर्जून संगितले.  

       डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी अशा प्रकारे महत्वाच्या राष्ट्रीय व्यक्तींचे जीवन कार्य आणि देशाची सद्यस्थिती या विषयांवर युवा मनाची स्पंदने टिपणे आवश्यक असल्याचे सांगत, युवकांनी महात्मा गांधींच्या विचारातील चिरंतन सत्यावर आजच्या चर्चेतून शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. यापुढेही अशा युवा चर्चा व विचार मंथन विविध विषयांवर सुरू ठेवण्याच्या युवकांच्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

अहिंसा म्हणजे शस्त्राला मारणारे शास्त्र! – प्रा. अशोक बागवे

              या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुप्रसिद्ध कवी प्रा. अशोक बागवे यांनी मोठ्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून सांगितले की, गांधीजींच्या अहिंसेच्या आणि सहिष्णुतेच्या तत्वज्ञानाची आज अतिशय गरज भासत असतांना या युवांनी अहिंसेच्या तत्वाचे गोडवे गाणे हे खूप आशादायी आहे. गांधी हे थोर तत्वज्ञ होते आणि त्यांची सर्व तत्वे स्वतःपासून सुरू होत होती. अहिंसा म्हणजे एका गालावर मारले की दूसरा गाल पुढे करणे नाही, तलवार आणि ढाल दोन्ही बरोबर घेऊन लढाई करणे म्हणजे अहिंसा पाळणे. अहिंसा हे शस्त्राला मारणारे शास्त्र आहे. अहिंसा ही मनाची साधना आहे, ती मनाची शक्ति आहे.  सुप्रसिद्ध लेखिका वासंती वर्तक या प्रसंगी म्हणल्या, गांधीजींच्या विचारात आणि जडणघडणीत महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे, त्यांचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले आणि त्यांचा सगळ्यात आवडता शिष्य विनोबा भावे दोघेही मराठीच.  स्वयंपूर्ण खेडी, ग्रामनिर्भर अर्थव्यवस्थेचे ते पुरस्कर्ते होते. तंत्रज्ञानाच्या अति वापराचे दुष्परिणाम जाणून, भूक हवी पण आधाशीपणा नको हा त्यांचा विचार होता.

जगात आपल्या देशाची ओळख गांधींचा भारत अशीच आहे! – प्रदीप इंदुलकर

             लघुपटकार आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांनी सांगितले, आपल्या देशात टीकेचे आणि टवाळीचे धनी असलेले गांधी बाकी जगात मात्र त्यांच्या अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या तत्वज्ञानामुळे आदरस्थानी आहेत आणि भारत देशाला गांधींचा देश असेच ओळखले जाते. हत्ती आणि आंधळे यांच्या गोष्टीत आज कोणी व्यक्तिमत्व बसवायचं म्हटलं तर ते गांधींचंच असेल इतक्या विविध अंगांनी गांधी आपल्याला भेटत असतात. गांधींसारख्या लोकोत्तर महापुरुषाच्या विचारांना बरोबर घेऊनच आपल्या देशाची प्रगती होईल.  तलाव अभियानाचे प्रणेते मयूरेश भडसावळे म्हणाले की, म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मिलाफ देशाला पुढे नेवू शकेल. गांधीजींचे स्वातंत्र्य व सत्याग्रह आणि आंबेडकरांचा स्वाभीमानाचा लढा यामुळेच भारतात सर्व जाती धर्माच्या लोकांना आत्मभान मिळाले आहे.  कवयित्रि प्रा. वृषाली विनायक यांनी, महात्मा गांधींनी कसे साध्या साध्या गोष्टींतून सामान्य जनांचे प्रबोधन करीत त्यांना स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची पर्वा न करता अहिंसेने लढण्यास प्रेरित केलं, हे समजावून सांगितलं.

महाविद्यालयीन युवांचा उदंड प्रतिसाद!

          या टॉक शोला ठाण्यातील ज्ञानसाधना, बेडेकर आर्ट्स अँड कॉमर्स, बांदोडकर सायन्स कॉलेज आणि केळकर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी तसेच विविध लोकवस्तीमधील एकलव्य विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चर्चेत सक्रीय सहभाग घेतला. जगदीश खैरालिया, उमा दिक्षीत, प्रवीण देशमुख, नीलिमा सबनीस, जयंत कुलकर्णी, शिवाजी पवार, गीता शहा, गिरीश साळगावकर, मानसी जोशी, लतिका सु. मो., मनीषा जोशी, मीनल उत्तुरकर, हर्षलता कदम, सुनील दिवेकर आदि मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMahatma Gandhiमहात्मा गांधी