शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीसह नवरात्रोत्सवात ध्वनी मर्यादा राखून १२ वाजेपर्यंत वाजवा डीजे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 18:57 IST

उच्च न्यायालयातील जनहित याचिका, पर्यावरण विभागाचे आदेश आदींचा संदर्भ देत नियमांचे पालन करीत ध्वनीची मर्यादा राखून डीजे वाजवण्यास परवानगी जारी करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे ध्वनीप्रदूषण होणार नसल्याची काळजी घेण्याच्या सूचना गणपती मंडळाना पोलिसांनी जारी केल्या आहेत. यामुळे डीजचा आवाज ठिकठिकाणी मंदावलेला ऐकायला मिळत आहे. श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे, आणि मजवानी कक्ष या सारक्ष्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी डीजेच्या ध्वनीची विहीत मर्यादा राखून वाजवण्यासठाणे जिल्हाप्रशासनाकडून परवानगी जारी झाली

ठळक मुद्देसकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत डीज वाजवण्यास परवानगी असली तरी त्यासाठी दिवसही निश्चित केले गणपती उत्सवा दरम्यान केवळ चार दिवस डीजे वाजवण्याची मुभा अष्टमी व नवमी या दोन दिवसांचा समावेश दिवाळीमध्ये केवळ लक्ष्मी पूजनच्या दिवशी डीजे वाजवता येईल

ठाणे : ध्वजीप्रदूषण टाळण्यासाठी विविध अटींसह ध्वनीची विहीत मर्यादा राखून गणपतीच्या या कालावधीसह नवरात्रोत्सवात सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत डीजे वाजवण्यास जिल्हा प्रशासनाने सहमती दर्शवली आहे. याशिवाय अन्य सणासुधीच्या कालावधीतही ध्वनी मर्यादा राखून डीजे वाजवण्यासाठी मार्गदर्शन सुचानाही पोलिसांना ठाणे जिल्हाप्रशासनाकडून जारी करण्यात आल्या आहेत.उच्च न्यायालयातील जनहित याचिका, पर्यावरण विभागाचे आदेश आदींचा संदर्भ देत नियमांचे पालन करीत ध्वनीची मर्यादा राखून डीजे वाजवण्यास परवानगी जारी करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे ध्वनीप्रदूषण होणार नसल्याची काळजी घेण्याच्या सूचना गणपती मंडळाना पोलिसांनी जारी केल्या आहेत. यामुळे डीजेचा आवाज ठिकठिकाणी मंदावलेला ऐकायला मिळत आहे. श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे, आणि मजवानी कक्ष या सारक्ष्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी डीजेच्या ध्वनीची विहीत मर्यादा राखून वाजवण्यासठाणे जिल्हाप्रशासनाकडून परवानगी जारी झाली आहे.सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत डीज वाजवण्यास परवानगी असली तरी त्यासाठी दिवसही निश्चित केले आहेत. यामध्ये गणपती उत्सवा दरम्यान केवळ चार दिवस डीजे वाजवण्याची मुभा आहे. यामध्ये दुसरा दिवस, पाचा दिवस, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी आदी दिवशी डीजे वाजवता येणार आहे. गणपती संपल्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवातीलही काही दिवस डीजे वाजवण्यासाठी निश्चित केले आहेत. यामध्ये अष्टमी व नवमी या दोन दिवसांचा समावेश आहे. दिवाळीमध्ये केवळ लक्ष्मी पूजनच्या दिवशी डीजे वाजवता येईल. तर ख्रिसमसला एक दिवस आणि ३१ डिसेंबरला केवळ एक दिवस डीजे वाजवण्याची मुभा देण्यात आली आहे.सध्याच्या या सणा सुधीच्या दिवसाप्रमाणेच वर्षभरात येणा-या सणांसाठी देखील डीजेचल ध्वनी मर्यादा राखण्याचे सूचित केले आहेत. यामध्ये शिवजयंती, ईद ए मिलाद, डॉ. आंबेडकर जयंती, १ मे  महाराष्ट्र दिन आदी दिवशी देखील ध्वनीची मर्यादा राखून डीजे वाजवता येणार आहे. यासाठी देखील सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंतच ध्वनी मर्यादा राखून डीजे वाजवता येणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त अतिरेक करून ध्वनीप्रदूषण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने पोलिसाना दिले आहेत. यास अनुसरून सध्या सुरू असलेल्या या गणेशोत्सवाच्या कालावधीत ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी पोलिसांसह गणेश मंडळांकडून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी