शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांच्या जीवाशी खेळ

By admin | Updated: May 30, 2017 05:46 IST

महापालिका कार्यक्षेत्रात सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात नालेसफाई सुरू आहे. मात्र, ती क रणाऱ्या सफाई कामगारांकडे योग्य ते

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिका कार्यक्षेत्रात सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात नालेसफाई सुरू आहे. मात्र, ती क रणाऱ्या सफाई कामगारांकडे योग्य ते संरक्षणात्मक साहित्य तसेच सुविधा नसल्याने ही नालेसफाई म्हणजे सफाई कामगारांच्या जीवाशी खेळ असल्याचे दिसत आहे. ही बाब काँग्रेसने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.ठाणे शहर काँग्रेसचे ब्लॉक क्रमांक-९ चे अध्यक्ष संदीप संभाजी शिंदे यांनी यापूर्वी भुयारी गटारांची साफसफाई करताना व गाळ काढताना विषारी वायूमुळे आणि प्राणवायूअभावी कित्येक कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच सफाई कामगार कुजलेल्या कचऱ्यामुळे व त्यातील रोगजंतूंमुळे सतत आजारी पडत आहेत. त्यांना कोणीही वाली नाही. या गरीब कायम व कंत्राटी कामगारांसाठी तोंडाला मास्क, प्लास्टिक-रबराचे हातमोजे आणि प्राणवायूचे सिलिंडर याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.भाजपाची तीन वर्षे, ३० थापांचीभाजपा सरकारने तीन वर्षांत काय केले असेल, तर मोठमोठी जाहिरातबाजी आणि काँग्रेस पक्षाने केलेल्या कामांचे उद्घाटन केले. भाषणों के शेर और नतिजों के ढेर, असलेल्या भाजपाने तीन वर्षांत ३० थापा मारल्याचा आरोप करून येत्या दोन वर्षांत काँग्रेस त्यांच्याविरोधात व्यापक आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली.मोदी सरकारचा ३ वर्षांचा प्रवास म्हणजे ३० थापा. मोदींनी निवडून येण्यापूर्वी केलेल्या घोषणा के वळ बहाणे असल्याचे या कार्यकाळात स्पष्ट झाले आहे. या सरकारने फक्त फसवणूक केली आहे. त्यातच ढासळलेली अर्थव्यवस्था. वाढती बेरोजगारी, शेती आणि उद्योगांची पीछेहाट अशांमध्ये मोदी सरकार तीन वर्षांचा जल्लोष साजरा करत आहे. याचदरम्यान, मोदी सरकारचा मेकअप उतरवून खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी काँग्रेस पुढील दोन वर्षांत व्यापक आंदोलन पुकारणार आहे. झूट बोलो, बार बार बोलो, हे मोदी सरकारचे ब्रीद असून ते लोकांची एकदाच फसवणूक करू शकतात. मार्केटिंग आणि जल्लोष ही भाजपाची कार्यपद्धती आहे. या जल्लोषासाठी पैसा येतो कोठून, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी प्रदेश सचिव बाळकृष्ण पूर्णेकर, संजय चौपाने, सुभाष कानडे, ठामपा परिवहन सदस्य सचिन शिंदे आदी उपस्थित होते.