शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी टाकण्याच्या कामामध्ये हलगर्जी; सर्व्हिस रोडची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 00:10 IST

वेल्फेअर असोसिएशनचे एमआयडीसीला पत्र

डोंबिवली : निवासी भागात एमआयडीसीकडून सध्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. सर्व्हिस रोडवर सुरू असलेल्या कामामध्ये हलगर्जी सुरू असल्याचा आरोप येथील डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे.

एमआयडीसीकडून नवीन जलवाहिन्या आणि पावसाळी गटार आणि छोटे नाले बांधण्याचे काम सध्या निवासी भागात सुरू आहेत. छोट्या जलवाहिन्यांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. दोन ते अडीच फूट व्यासाच्या जलवाहिन्या सर्व्हिस रोडवर जमिनीखालून टाकण्याचे काम सुरू आहे. जाणकारांच्या मते या वाहिन्या टाकताना त्यावर प्लास्टिक कोटिंग करणे गरजेचे आहे. तसेच वाहिन्या जमिनीखाली टाकताना त्याच्या खाली व बाजूला काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे; पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोटिंगचे काम सुरू झाले आहे.

जलवाहिन्यांच्या खालच्या काँक्रीटीकरणाकडे मात्र कानाडोळा झाला असल्याकडे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने लक्ष वेधले आहे.सध्या सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे खणून त्यात जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. या कामामुळे हा रोड खोदण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर निवासी भागातील जे मोजके रस्ते एमआयडीसीकडून सुस्थितीत आणले होते. त्यापैकी एक असलेल्या सर्व्हिस रोडची या खोदकामांमुळे पुन्हा दुर्दशा झाली आहे. एमआयडीसीत जमिनी खालून महानगर गॅसच्या वाहिन्या टाकल्या आहेत. त्याच्याच बाजूला महावितरणच्या केबल आणि खासगी मोबाइल कंपन्यांच्याही केबल आहेत. जलवाहिन्या आणि गटार, नाले बांधकामासाठी खोदकाम करताना सरकारी आणि खासगी कंपन्यांचा एकमेकांशी समन्वय नसल्याने भविष्यात एखादी दुर्घटना घडून जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबतीत गांभीर्याने विचार करून उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.पाण्याची क्षमता न तपासता बांधणीगटार आणि छोेटे नालेबांधणीचे काम सुरू आहे; पण पावसात पडणाऱ्या पाण्याची वहन क्षमता न तपासता काही ठिकाणी लहान तर काही ठिकाणी मोठ्या आकाराचे गटार आणि नाले बांधण्याचे काम चालू आहे. नाल्याच्या रुंदीत तसेच काँक्रीटच्या भिंतीतही कमी-अधिक जाडीचा फरक असल्याचे वेल्फेअर असोसिएशनचे म्हणणे आहे. दरवर्षी निवासी भागात पावसाळ्यात येणाºया पुराचा विचार ही कामे करताना केला गेला नसल्याचा आरोप असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी केला आहे.