शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीची गॅलरी कोसळली; उल्हासनगरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:13 IST

रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले

उल्हासनगर : कॅम्प नं-२, गुजराथी शाळेजवळील साई कुटीर या सहा मजली इमारतीची गॅलरी शुक्रवारी दुपारी ३ च्या दरम्यान कोसळली. महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत रिकामी केली असून आयुक्त सुधाकर देशमुख यांनी इमारतीची पाहणी केली.उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न जैसे थे असून गुजराथी शाळेजवळील सहा मजल्यांच्या साई कुटीर इमारतीमधील पहिल्या मजल्याची गॅलरी दुपारी कोसळली. या प्रकाराने इमारतीमधील कुटुंबांत भीतीचे वातावरण पसरले. प्रत्येक मजल्यावर एकच सदनिका, तर तळमजल्यावर सात दुकाने आहेत. एकूण सहापैकी तीन कुटुंबे यापूर्वीच इमारत सोडून गेले आहेत. इमारत धोकादायक यादीत नसल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. शिंपी व भगवान कुमावत यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीमधील कुटुंबांना बाहेर काढून आयुक्तांच्या आदेशानुसार इमारत सील केली. सर्व कुटुंबे श्रीमंत असून त्यांना पर्यायी इमारतीत स्थलांतरित केले आहे. आयुक्त देशमुख यांनी साई कुटीर इमारतीची पाहणी करून इमारतीभोवती संरक्षण कठडे उभारले. काही वर्षांपूर्वी साई कुटीर इमारतीशेजारील शिशमहल इमारतीचा स्लॅब कोसळून सात जणांचा बळी गेला होता. तसेच परिसरातील अनेक इमारती महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. १९९० ते ९५ दरम्यान रेती बंद असताना दगडाचा चुरा व वालवा रेतीपासून बनवण्यात आलेल्या बहुतांश इमारती धोकादायक होत असून साई कुटीर इमारतही याचदरम्यान बांधण्यात आली आहे. मात्र, ही इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत नव्हती. शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून २० वर्षे जुन्या सर्वच इमारतींचे सर्वेक्षण पालिकेने सुरू केले आहे.धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी शक्य?शहरातील धोकादायक व ३० वर्षे जुन्या इमारतींची पुनर्बांधणी शक्य आहे. राज्य सरकारने काढलेल्या विशेष अध्यादेशात फेरबदल करून धोकादायक व ३० वर्षे जुन्या इमारतीच्या पुनर्बांधणीला राज्य सरकारने मंजुरी दिली. तसेच वाढीव चार चटईक्षेत्र देण्यात आले.