शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी रंगायतन अतिधोकादायक वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:24 IST

नवीन वास्तू बांधा; जाधव यांची मागणी

ठाणे : शहरात नाट्यप्रेमींसाठी महत्त्वाचे मानले जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतनची वास्तू आता अतिधोकादायक वास्तूंच्या यादीत आली आहे. ठाण्याच्या इतिहासात या वास्तूने मानाचा तुरा रोवला आहे. या वास्तूची वारंवार डागडुजी करून पुन्हा पुन्हा ती नाट्यरसिकांसाठी खुली करण्यात येत आहे. वास्तविक पाहता ही वास्तू पाडून पुन्हा नव्याने उभारण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित होते. परंतु, तसे न होता त्याची तात्पुरती मलमपट्टी करून नाट्यरसिकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार प्रशासनाकडून सुरू आहे. यामुळे तिची डागडुजी न करता ती नव्याने उभारावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.ठाणे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गडकरी रंगायतन उभे आहे. ही वास्तू उभारून आता २५ वर्षांपेक्षा जास्तीचा काळ लोटला आहे. त्यातही तिची अनेक वेळा डागडुजी केली आहे. त्यामुळे ती धोकादायक स्थितीत आली आहे. मागील वर्षी दोन वेळा तिचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. या दोनही ऑडिटमध्ये ही वास्तू ‘अतिधोकादायक’ झाली असून ती पाडून पुन्हा उभारावी, असे स्पष्ट केले आहे. या नाट्यगृहात १२०० च्या आसपास रसिक विविध नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी येत असतात. परंतु, ही वास्तू अतिधोकादायक झाल्याने भविष्यात एखादा प्रयोग सुरू असताना काही हानी झाली तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का? याचेही उत्तर द्यावे, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.