शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वनविभाग ठरविणार दिवा डम्पिंगचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:57 IST

आंदोलन तूर्तास स्थगित; पालिका उपायुक्तांच्या बैठकीनंतर घेतला निर्णय

ठाणे : ठाणे महापालिकेने दिव्यातील बेकायदा डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या प्रक्रियेला वेळ जाणार असून आजही येथील उर्वरित जागेवर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरनंतर कचऱ्याचा एकही डम्पर दिव्यात येऊ देणार नसल्याचा इशारा स्थानिक नगरसेवक तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिला होता. गुरुवारी उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन स्थगित केल्याचे स्पष्ट करत मढवी यांनी तलवार म्यान केली आहे. पुढील आठवड्यात नागपूरची वारी करून वनविभागाची एनओसी आणली जाणार असल्याने हे आंदोलन स्थगित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मागील महिन्यात झालेल्या महासभेत दिव्यातील डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव चर्चेसाठी आला असता स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील यांनी विरोध केला. यासाठी केला जाणारा खर्च हा खूप वाढीव असल्याचा दावा राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला होता. ही चर्चा सुरू असतानाच दिव्यातील नगरसेवक आक्रमक झाले. त्यातच दिव्यातील डम्पिंग बंद नाही झाले, तर ३१ डिसेंबरनंतर या भागात महापालिकेचा कचºयाचा एक डम्परही फिरकू देणार नसल्याचा इशारा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिला होता.वनविभाग एनओसी देणार काय?मढवी यांनी उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेऊन डम्पिंग केव्हा बंद होणार, असा सवाल केला. त्यानंतर, वनविभागाची जागा डम्पिंगसाठी प्रस्तावित असून त्याची एनओसी घेण्यासाठी पुढील आठवड्यात मढवी स्वत: उपायुक्तांसह नागपूरवारीला जाणार आहेत.त्यानंतर, कदाचित येत्या काही दिवसांत दिव्यातील डम्पिंगचा प्रश्न तात्पुरता सुटू शकतो, अशी शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे. येत्या वर्षभरात डायघरचा प्रकल्पही सुरू होणार असल्याने कचºयाची समस्या मार्गी लागेल, असेही या बैठकीत सांगण्यात आले.एकूणच हे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे मढवी यांनी स्पष्ट केले. मात्र, सीआरझेडसह केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या जाचक अटी पाहता वनविभाग एनओसी देणार का, हा प्रश्न असून त्यावरच दिवा डम्पिंगचे पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :dumpingकचरा