शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या हाती ‘त्या’ डॉक्टरांचे भवितव्य

By admin | Updated: May 12, 2017 01:28 IST

केडीएमसीच्या रुग्णालयात मागील पाच वर्षांपासून सेवा देणाऱ्या बीएमएस आणि एमबीबीएस डॉक्टरांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसीच्या रुग्णालयात मागील पाच वर्षांपासून सेवा देणाऱ्या बीएमएस आणि एमबीबीएस डॉक्टरांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. परंतु, महापालिकेविरोधात न्यायालयात दाद मागणाऱ्या डॉक्टरांना सेवेत घेतले जाते की न्यायालयाच्या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे. आयुक्त ई. रवींद्रन हे प्रशिक्षणानंतर गुरुवारी केडीएमसीत रुजू झाले आहेत. त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून संबंधित डॉक्टरांचे त्याकडे लक्ष लागले आहे. महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी येतात. परंतु, डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णालये चालवायची कशी, असा यक्षप्रश्न केडीएमसी प्रशासनाला पडला आहे. त्यात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने उपचारासाठी रुग्णाला मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालय तसेच केईएमला नेण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांकडून दिला जातो. डॉक्टरांअभावी रुग्णांच्या होणाऱ्या हेळसांडप्रकरणी महापालिकेचे स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी मागील आठवड्यात डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाला धडक देत तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्या वेळी त्यांनी महापालिकेला काही वर्षे सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सेवेत दाखल करून घ्या, अशाही सूचना केल्या होत्या. केडीएमसीच्या आस्थापना सूचीवरील डॉक्टरांची २४ पदे रिक्त आहेत. त्यात गेली काही वर्षे अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या बीएमएस आणि एमबीबीएस डॉक्टरांना महापालिका सेवेत दाखल करून घ्या, असे आदेश न्यायालयाने दिल्याने कायमस्वरूपी डॉक्टर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१३ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात १० बीएमएस आणि १३ एमबीबीएस डॉक्टरांची भरती केली होती. स्थायी समितीच्या मान्यतेने त्यांना दर सहा महिन्यांनी मुदत दिली जात होती.