शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

३९० शाळांचे भवितव्य धोक्यात

By admin | Updated: September 5, 2015 02:52 IST

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा सर्वाधिक असून जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांतही विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळा आढळल्या आहेत

सुरेश लोखंडे , ठाणेग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागात कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा सर्वाधिक असून जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांतही विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळा आढळल्या आहेत. जिल्हाभरात या सुमारे ३९० शाळा बंद होण्याचे संकट असून त्यातील सर्वच शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका, नगरपालिका क्षेत्रासह आदिवासी, दुर्गम भागातील या ३९० शाळा आहेत. या केवळ ११ व २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आहेत. त्यांच्यावर तर आधीपासूनच बंद होण्याचे संकट ओढवलेले आहे. पण, राज्य शासनाने सुमारे आठवड्याभरापूर्वी काढलेल्या अध्यादेशानुसार ६० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना शिक्षक न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बंद पडणाऱ्या या शाळांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसारही ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शाळा बंद होऊन शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात सध्या चार हजार ४५३ शाळा असून त्यामध्ये १५ लाख १६ हजार २९५ विद्यार्थी आहेत. त्यांना ३९ हजार ८८४ शिक्षक शिकवत आहेत. ११ पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या १२१ शाळा आहेत. यामध्ये सर्वाधिक १०५ प्राथमिक शाळा, पाच उच्च प्राथमिक,दहा माध्यमिक, एका उच्च माध्यमिक शाळेचा समावेश आहे. यातील सर्वाधिक प्राथमिक ५४ शाळा मुरबाड तालुक्यात असून ३२ शाळा शहापूर तालुक्यात आहेत. या खालोखाल भिवंडीला सात, अंबरनाथला पाच, कल्याणला चार, मीरा-भार्इंदरला दोन आणि उल्हासनगरला एक शाळा आहे. याप्रमाणेच २० पेक्षा कमी असलेल्या २६९ शाळा जिल्ह्यात आहेत. यामध्ये २४९ शाळा प्राथमिक आहेत. त्यापैकी प्राथमिक शाळा मुरबाडला ९१, शहापूरला ८८, भिवंडीला ३४, कल्याणला १४, अंबरनाथला १३, कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई मनपा क्षेत्रात प्रत्येकी तीन शाळांचा समावेश आहे. ठाणे, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर या महापालिकेत एक शाळाआहे.