शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

स्मारकाच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 01:33 IST

एकनाथ शिंदे यांची ग्वाही : बदलापूरमध्ये झाले बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर :  बदलापूरमध्ये साकारण्यात येणाऱ्या सुसज्ज स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही. सरकार आपले आहे, त्यामुळे निधी कमी पडू देणार नाही. हे स्मारक नागरिकांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हा भूमिपूजन सोहळा पार पडला. बदलापूर येथे पालिकेच्या वतीने बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम करण्यात येणार आहे. हे स्मारक राज्यातील पहिले स्मारक म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे स्मारकाचे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार व्हावे यासाठी निधी कमी पडू देणार नाही. बाळासाहेब हे नावच तमाम नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण करणारे आहे. या स्मारकात परिपूर्णता असेल. या स्मारकातून व्यंगचित्रकार, कलाकार, कलासक्त रसिक आणि कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे, कलाकारांची कदर करणाऱ्या बाळासाहेब यांचे विचार येणाऱ्या रसिकांना मिळतील. 

या स्मारकास ठाणे जिल्ह्यातूनच नव्हेतर, संपूर्ण राज्यातून बाळासाहेबांवर भरभरून प्रेम करणारे रसिक अवश्य भेट देतील, असा विश्वासही शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला. त्यामुळे त्यांचे स्मारकही त्यांच्या नावाला साजेसे व्हावे ही इच्छा आहे. त्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम वामन म्हात्रे यांनी करावे. स्मारक लवकरात लवकर पूर्ण करून ते नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.स्मारकाचा आराखडा पाहता हे स्मारक राज्यातील चांगल्या स्मारकांमध्ये गणले जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. या भूमिपूजन सोहळ्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख वामन म्हात्रे, नगरसेवक तुकाराम म्हात्रे, प्रवीण राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंनी शपथ घेताच आराखडा मंजूरबाळासाहेबांच्या नावाने भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला होता. त्याचा आराखडा तयार करून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र युतीचे सरकार असतानाही दबावामुळे या आराखड्याला मंजुरी मिळत नव्हती. त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होता. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेताच आठव्या दिवशी ए.डी.टी.पी. कार्यालयाने या आराखड्याला मंजुरी दिली. ठाकरे सरकारमुळे या स्मारकाचे काम पुढे सरकत असल्याचा विश्वास वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे