शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाकडून वृद्धेचा अवमान, आधारकार्डची प्रत दाखवूनही आकारले पूर्ण तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 03:35 IST

नालासोपारा ते ठाणे दरम्यान एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणा-या ६५ वर्षीय महिलेने ज्येष्ठ नागरिकाचे कार्ड तसेच आधार कार्डची प्रत दाखवूनही त्यांच्याकडून महिला वाहकाने पूर्ण तिकिट आकारले.

ठाणे : नालासोपारा ते ठाणे दरम्यान एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणा-या ६५ वर्षीय महिलेने ज्येष्ठ नागरिकाचे कार्ड तसेच आधार कार्डची प्रत दाखवूनही त्यांच्याकडून महिला वाहकाने पूर्ण तिकिट आकारले. वारंवार विनंती करूनही तिकीटाचे पूर्ण पैसे द्या, अन्यथा खाली उतरा अशा भाषेत त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने एसटी महामंडळाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी आहे.ठाण्यात वास्तव्याला असलेल्या नलिनी मधुकर रेडकर या २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नालासोपारा येथे काही कामानिमित्त गेल्या होत्या. नालासोपारा येथून ठाण्याकडे येणाºया राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसमध्ये दुपारी त्या बसल्या. ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत असल्याने तिकिटाची अर्धी रक्कम देऊन त्यांच्याकडील ज्येष्ठ नागरिकाचे कार्डही संबंधित वाहकाला त्यांनी दाखविले. यावर ए. डी. खरात या महिला वाहकाने ज्येष्ठ नागरीक कार्डासोबतच वयाच्या पुराव्याची त्यांच्याकडे विचारणा केली. सोबत आधारकार्डची प्रतही त्यांनी दाखविली. त्यावर आधारकार्डची रंगीत झेरॉक्स प्रत असल्यामुळे ती चालणार नसल्याचा दावा करून खरात यांनी तिकिटाची पूर्ण रक्कम त्यांच्याकडे मागितली. नालासोपाºयाकडे येतांना हेच कार्ड दाखविल्यानंतर आधीच्या वाहकाने निम्मेच तिकीट घेतल्याचाही दावा रेडकर यांनी केला. ते तिकिटही त्यांनी दाखविले. हा आपला नेहमीचा प्रवास असून या प्रवासात ही सवलत मिळत असल्याचे वारंवार त्यांनी सांगूनही तिकिटाचे पूर्ण पैसे भरा, अन्यथा खाली उतरा असा, दम त्यांनी दिल्याने रेडकर यांनी पूर्ण तिकिट काढून तो प्रवास केला. मात्र, अर्ध्या तिकिटाची सवलत ज्येष्ठ नागरिकांना असतांनाही अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्या व्यथित झाल्या.ज्येष्ठ नागरिक कार्ड हे ज्येष्ठांनाच मिळते. सोबत आधार कार्डची रंगीत झेरॉक्स प्रत, ठाणे ते नालासोपारा या प्रवासाचे अर्ध्या दराचे तिकिट दाखवूनही पूर्ण तिकिट काढण्याची सक्ती एसटीच्या वाहकाने का केली? अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देणाºया संबंधित वाहकावर कारवाईची मागणी करण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकाचे कार्ड प्रमाण मानण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.>नलिनी रेडकर यांनी राष्टÑवादी ठाणे शहर ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांच्या मार्फतीने ही तक्रार आमच्याकडे केली आहे. प्रवासी महिलेचे ज्येष्ठ नागरिकाचे कार्ड तपासले. नियमाने तिचे निम्मे तिकिट घेऊन त्यांना सवलत देणे अपेक्षित होते. त्यांनी तसे केले नाही. संबंधित बस आणि वाहक हे नालासोपारा (पालघर जिल्हा) आगाराचे आहेत. त्यामुळे या वाहक महिलेवर कारवाई करण्याचे पत्र पालघर विभागाला देण्यात आले आहे.- अविनाश पाटील, विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन सेवा, ठाणे