शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

इंधन दरवाढीचे बसताहेत सर्वसामान्यांना चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:19 IST

गृहिणींचे बजेट कोलमडले; कोरोनामुळे बसला आहे आर्थिक फटका

स्नेहा पावसकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असून, त्यामुळे सामान्य माणसाला जगणे कठीण होत चालले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी वाढलेले पाहायला मिळतात, तर गॅस सिलिंडरच्या वाढत्या दराचे चटके सामान्य गृहिणींना सहन करावे लागत आहेत.कोरोनामुळे गेल्या वर्षभरात अनेकांचे वेतन रखडले, कोणाचे वेतन कमी झाले. काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींचे उद्योगधंदे बुडाले. या सगळ्यात सामान्य माणूस भरडला गेला. त्याच्यावर सर्वच बाजूने महागाईची कुऱ्हाड कोसळल्याने तो अधिकच चिंताग्रस्त झाला आहे. गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या दोन महिन्यांत अचानक वाढ झाल्याने स्वयंपाकघरातील खर्चाचे गणित जुळवायचे कसे हा प्रश्न त्यांना सतावत आहे.साधारण नोव्हेंबरमध्ये पेट्रोलचा दर साधारण ८७.७७ रुपये इतका होता. डिसेंबर महिन्यात तो साधारण ८८ रुपयांहून अधिक झाला. नववर्षाच्या सुरुवातीला पेट्रोलने नव्वदी पार केली आणि आता तो  ९३ रुपये प्रतिलिटर आहे. डिझेलच्या दरातही गेल्या चार महिन्यांत ७ ते ८ रुपयांची वाढ होऊन मुंबई- ठाणेतील डिझेलचा सध्याचा दर ८२- ८३ रुपये इतका आहे. दुसरीकडे गॅस सिलिंडरचे दरही नोव्हेंबर महिन्यात ५९५ रुपये होते. डिसेंबरमध्ये त्यात १०० रुपये वाढ झाली. तर १ फेब्रुवारीपासून पुन्हा त्यात २५ रुपये वाढ झाली. सध्या सिलिंडरचा दर ७२० रुपये आहे.सोशल मीडियावरही चर्चा या वाढत्या पेट्रोल दरवाढीचे पडसाद सोशल मीडियावरही पाहायला मिळाले. !पेट्रोलचे दर दररोज वाढत आहेत, तसेच पगाराचे पण पाहिजे होते, रोज सकाळी पाहिले की वाढलेला दिसला पाहिजे.’ तसेच ‘पेट्रोलचे दर आता १०० रुपये झाले की सगळ्यांनी हेल्मेट काढून वर आकाशाकडे पाहा रे, कारण तशी पद्धतच आहे ना, शंभर धावा झाल्या की हेल्मेट काढून वर आकाशात पाहायचं, असे मेसेज पोस्ट होत होते.गॅसच्या दरात गेल्या २ महिन्यांत साधारण १२५ रुपयांची वाढ झाली आहे. गॅस साधारण जेमतेम महिनाभर पुरतो. त्यामुळे परवडत नाही. वाढत्या महागाईमुळे आधीच आमच्यासारखी माणसं त्रस्त आहेत. या इंधन दरवाढीने अधिक भरडले जात आहोत.     - रुचा घोगरे, गृहिणीआधीच कोरोनामुळे कमी वेतनात नोकरी करावी लागतेय. त्यातच पेट्रोलचे दर वाढत आहेत. कामासाठीही गाडीचा प्रवास परवडत नाही. मात्र, महाग होत असले तरी पेट्रोल, डिझेलचा वापर करावाच लागतोय. सामान्यांचा विचार करून इंधन दरवाढ थोडीतरी कमी केली पाहिजे.     - देवेश फोंडकर, ठाणे

टॅग्स :Petrolपेट्रोल