शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

‘अपक्ष’ ठरणार प्रस्थापितांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2015 03:14 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल ७५० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यंदा बहुपक्षीय लढत होत असली तरी यात उभे ठाकलेले २५२ अपक्ष उमेदवार

- प्रशांत माने,कल्याणकल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल ७५० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यंदा बहुपक्षीय लढत होत असली तरी यात उभे ठाकलेले २५२ अपक्ष उमेदवार प्रस्थापितांसाठी एकप्रकारे डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. परिणामी होणारे मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. केडीएमसीच्या १२२ प्रभागांपैकी तीन प्रभागातील उमेदवार बिनविरोध तर अन्य दोन प्रभागांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे ११७ प्रभागांत निवडणूक होत आहे. .यंदा शिवसेना -भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असताना आघाडी होऊनही काँग्रेस-राष्ट्रवादीत उमेदवार उभे करण्यावरून वाद सुरू आहे. मनसेदेखील स्वबळावर लढत असून रिपाइं, बसपा, बहुजन विकास आघाडी, कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, मार्क्सवादी पक्ष, भारीप बहुजन महासंघ, समाजवादी पक्ष, पिपल्स रिपब्लिकन पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक, एमआयएम या पक्षांच्या उमेदवारांसह तब्बल २५२ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. केडीएमसी निवडणुकींचा इतिहास पाहता निवडून येणाऱ्या अपक्षांची भूमिका सत्ताकारणात नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेने अपक्षांच्या मदतीने सत्तेचा पहिला झेंडा महापालिकेवर फडकविला होता. २००५ च्या निवडणुकीतही अपक्षांच्या सहकार्याने युतीच्या सत्तेला सुरूंग लावून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता केडीएमसीत आली होती. त्याच अपक्षांच्या साथीने अडीच वर्षानी पुन्हा एकदा सत्ता पटकाविण्यात युतीला यश आले होते. २०१० च्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहीली असलीतरी अपक्षांच्या बळावर शिवसेना भाजपा सत्तारूढ झाली होती. यंदाच्या निवडणुकीत २५२ अपक्ष उमेदवार उभे ठाकले आहेत. मागील निवडणुकांचे चित्र पाहता २०१५ च्या सत्तेची गणितही अपक्षांवर ठरण्याची दाट शक्यता आहे. बहुपक्षीय लढतीमुळे मतांचे विभाजन होणार असले तरी अपक्षांचा यात मोठा वाटा असणार यात शंका नाही.