शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

कल्याणमध्ये ‘महावितरण’च्या कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:38 IST

बॅग बनवण्याच्या कारखान्यातील कामगार नितीश शाहू याच्या अंगावर विजेची तार पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना श्रीराम टॉकीजजवळील रस्त्यावर २७ जुलैला घडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : बॅग बनवण्याच्या कारखान्यातील कामगार नितीश शाहू याच्या अंगावर विजेची तार पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना श्रीराम टॉकीजजवळील रस्त्यावर २७ जुलैला घडली होती. शाहूच्या वारसांना भरपाई मिळावी व विजेच्या जीवघेण्या तारांची दुरुस्ती-देखभाल करावी, अन्यथा त्या इतत्र हटवाव्यात, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या पुढाकारने बॅग मॅन्युफॅक्चरिंग वेल्फेअर असोसिएशनतर्फे शहरातील ‘महावितरण’च्या तेजश्री कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.काँग्रेसचे ब्रीजकुमार दत्त, कांचन कुलकर्णी, शैलेश तिवारी, राहुल काटकर, सीमा खान आदी पदाधिकाºयांच्या पुढाकाराने निघालेल्या या मोर्चात बॅग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शाहू याच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब निराधार झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला. शाहूच्या कुटुंबीयांना भरपाई मिळावी, अशी मागणी मोर्चेकºयांनी या वेळी केली. नितीशच्या मृत्यूस महावितरणचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली.याप्रकरणी महावितरणचे कार्यकारी अभियंता नंदकिशोर काळे यांची मोर्चेकºयांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी काळे यांनी याप्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच भरपाई देण्याचाही विचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.