शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील मैत्री पडली महागात, कल्याणच्या विवाहितेवर ठाण्यात अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:23 IST

फेसबुकची मैत्री कल्याण-मुरबाड रोड येथील चोवीसवर्षीय विवाहितेला चांगलीच महागात पडली आहे.

ठाणे : फेसबुकची मैत्री कल्याण-मुरबाड रोड येथील चोवीसवर्षीय विवाहितेला चांगलीच महागात पडली आहे. नोकरीचे आमिष दाखवून चंदिगढ येथील मंगतपाल सिंग (२४) या तरुणाने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर ठाण्यात अत्याचार केला. तसेच यावेळी काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.पीडित विवाहितेची गेल्या वर्षी त्या तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्यातच त्याने तिला नोकरीचे आमिष दाखवून बोलणी करण्यासाठी ठाण्यात बोलवून बाळकुम येथील हॉटेलमध्ये नेले. दरम्यान, त्याने तिच्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून ते तिला सेवन करण्यासाठी दिले. त्यानंतर, त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची एक व्हिडीओ क्लिप तयार केली.ती क्लिप तिच्या पतीला दाखवतो तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप त्या पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच हा प्रकार २ आॅक्टोबर २०१७ रोजी घडला असून याप्रकरणी तिने शुक्रवारी रात्री कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अत्याचारासह फसवणूक आदी प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. देशमुख करत आहेत.