शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीच्या पालखीचे भोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 05:31 IST

पहिल्याच भेटीत आपल्याला निखळ मैत्रीच्या नात्यात आणणारे वसंत डावखरे नावाचे अजब रसायन होते. कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने या माणसानं स्वत:ला घडवले. सामान्य परिस्थितीत पोटापाण्यासाठी चाकरी करण्यापासून नगरसेवक ते विधान परिषदेचे उपसभापतीपद एवढी मोठी मजल त्यांनी गाठली होती.

- हेमंत टकले,आमदार विधान परिषद, लेखकपहिल्याच भेटीत आपल्याला निखळ मैत्रीच्या नात्यात आणणारे वसंत डावखरे नावाचे अजब रसायन होते. कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने या माणसानं स्वत:ला घडवले. सामान्य परिस्थितीत पोटापाण्यासाठी चाकरी करण्यापासून नगरसेवक ते विधान परिषदेचे उपसभापतीपद एवढी मोठी मजल त्यांनी गाठली होती. रूढअर्थाने अपेक्षित असलेले राजकारणही त्यांनी कौशल्याने हाताळले. ज्या महत्त्वाच्या पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळत गेली, त्या स्थानावरून गोरगरिबांच्या, कष्टकºयांच्या हिताची जपणूक करण्याचा वसा त्यांनी अंगीकारला. राजकारण एके राजकारण हे सूत्र त्यांना कधीच बंधनात अडकवू शकलेले नाही. अत्यंत सहजतेने त्यांचा कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक कार्य ह्या सर्वांत वावर होता. माणसं जोडत जाणे, हा तर त्यांच्या जगण्याचा श्वास झाला. बरं हे सगळं दिखाऊ किंवा मोठेपणा मिरविण्यासाठी, प्रसिद्धीसाठी काहीतरी मिळविण्यासाठी कधीच नव्हते. एखाद्या गावाकडचा सामान्य परिस्थितीतला खेळाडू असेल, कलेच्या प्रांतात धडपड करणारा कुणी कलाकार असेल, परिस्थितीने भरडलेला कुणी अभागी असेल, सरकारी यंत्रणेकडून अन्याय झालेला कुणी पीडित असेल अशी असंख्य माणसे हक्काने आपली कैफियत घेऊन डावखरे साहेबांकडे यायची. माणसाची पारख करण्यात वसंतरावांचा हातखंडा होता. आलेल्या माणसाचे काम आपण केलेच पाहिजे, ह्या जाणिवेने मग ते पछाडलेले असत. ते काम होण्यासाठी अटीतटीची वेळ आली तरी ते मागे हटत नसत. काही वेळा येणारा माणूसही चूक करून आलेला असतो. त्याला अपराधीपणाची जाणही असते. पण, माणुसकी म्हणून त्याला पुन्हा संधी द्यायला हवी, ही वसंतरावांची भूमिका असायची. प्रसंगी त्याबद्दल त्यांना टीकेचा धनी व्हायाला लागले आहे. अनेक नेत्यांना लोक काय म्हणतील, ह्या यक्षप्रश्नाने ग्रासलेले असते. पण, वसंतरावांचं सूत्र पक्कं असायच. लोक म्हणायचे ते म्हणत राहतील, त्याची एवढी चिंता नको. माझ्या मनाला पटलं आणि योग्य वाटलं तर तो प्रश्न मी मार्गी लावणारच, हा निर्धार पक्का असायचा. त्यांची ऊठबस सगळ्या प्रमुख नेत्यांबरोबर स्रेहाची राहिली आणि कुणीही तर्कटपणाने त्याचे वेगळे अर्थ काढले नाहीत. सभागृहाच्या कामकाजात काही अटीतटीचे मुद्दे येतात, वातावरण संतप्त होते ह्या सर्वांवरचा रामबाण उपाय म्हणजे वसंत डावखरे हा परवलीचा शब्द झाला होता. तणाव कमी करणे, वातावरणात मार्मिक पण खुसखुशीत टिप्पणी करून हास्याची लहर निर्माण करणे हे त्यांचे कसब विलक्षण होते. असा हा अवलिया मित्र असणे म्हणजे खूप श्रीमंत आहोत, असे वाटायचे.

टॅग्स :Vasant Davkhareवसंत डावखरेVasant Davkhare passes awayवसंत डावखरे यांचं निधन