शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहतुकीसोबत लालपरीतून मालवाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:44 IST

तोटा भरून काढणार; एसटी महामंडळाने शोधला पर्याय, वाडा येथून एक मालवाहतूक बस रवाना

वाडा : कोरोना काळात एसटीची सेवा खंडित झाल्यामुळे महामंडळ तोट्यात आले असून कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले आहेत. परिणामी काही कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तोट्यात असलेल्या महामंडळाने पर्याय म्हणून आता चक्क शासकीय व खासगी मालवाहतूक सेवाही सुरू केली आहे. गुरूवारी दुपारी वाडा येथील धान्य गोदामातून बसमध्ये धान्य भरून धान्य दुकानात पाठविण्यात आले.कोरोना काळात गेली पाच महिने एसटी बससेवा बंद असल्याने हजारो चालक-वाहक घरी आहेत. त्यातच आता किरकोळ प्रमाणात बससेवा सुरू केली असली तरी सद्यस्थितीत बसमध्ये प्रवासी संख्या कमी असते. त्यामुळे आणखी किती काळाने बससेवा सुरळीत होईल सांगता येत नसल्याने एसटी महामंडळ अडचणीत आले आहे. कर्मचाºयांचे पगार अडकले आहेत. यावर तोडगा म्हणून एसटी महामंडळाने आता प्रवासी सेवेबरोबर माल वाहतूकही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने एसटी आगारातील जुन्या बसेसमध्ये बदल करून आतील सर्व शीट काढून मागे मोठा दरवाजा करून खास माल वाहतुकीसाठी गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. या बसेसमधून शासकीय व खाजगी मालवाहतूक करणार असून महामंडळाने झालेला तोटा भरून काढण्यासाठी अशाप्रकारे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.वाडा आगारात सद्य:स्थितीत एक मालवाहतूक बस तयार करण्यात आली असून त्यामधून माल वाहतूक सुरू केली आहे. यापुढे आणखी सहा बसेस माल वाहतुकीसाठी तयार करण्यात येणार आहेत.- मधुकर धांगडा, आगारप्रमुख,वाडा आगार