शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील भूखंड फ्रीहोल्ड करा

By admin | Updated: May 11, 2017 01:50 IST

एमआयडीसी निवासी भागातील भूखंड फ्रीहोल्ड करावेत, अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील भूखंड फ्रीहोल्ड करावेत, अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.शहरातील एमआयडीसीचे निवासी क्षेत्र १०० हेक्टर जागेवर आहे. येथे ४०० गृहनिर्माण सोसायट्या, तर ३०० बंगले आहेत. शाळा, कॉलेज, रुग्णालये, सरकारी कार्यालये, मंगल कार्यालयेही आहेत. हे सगळे ९५ वर्षांच्या भाडेपट्टे करारावर देण्यात आले आहे. क्रीडांगणे, शैक्षणिक संस्था यांना भूखंड १० वर्षे भाडेपट्टे कराराने दिले आहेत. राज्य सरकारने नुकतेच नवी मुंबईतील सिडकोचे भूखंड फ्रीहोल्ड केले आहेत. त्याच धर्तीवर डोंबिवली निवासी भागातील भूखंड फ्रीहोल्ड करावेत, अशी मागणी नलावडे यांनी केली आहे. भूखंड फ्रीहोल्ड केल्यास भूखंड व सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न निकाली निघेल. अंतिम भाडेकरार पद्धत रद्द होईल. रहिवाशांना त्यांच्या इमारती व घर यांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी कर्ज मिळवणे सोयीचे होईल. यातून एमआयडीसीला महसुली रक्कम मिळेल. त्यातून कर्मचाऱ्यांवरील खर्च वाचेल, अशी सूचनाही नलावडे यांनी केली आहे.