शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

१०० रुपयांत दहा वर्षे मोफत वायफाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 10:10 IST

१00 रुपयात नावनोंदणी करून मोफत वायफाय सेवेचा लाभ ठाणेकरांना लवकरच मिळणार आहे. ठाणे महापालिका या योजनेवर काम करीत असून, पहिल्या टप्प्यात शहरातील काही भागात ही सेवा सुरू केली जाणार आहे.

ठाणे : १00 रुपयात नावनोंदणी करून मोफत वायफाय सेवेचा लाभ ठाणेकरांना लवकरच मिळणार आहे. ठाणे महापालिका या योजनेवर काम करीत असून, पहिल्या टप्प्यात शहरातील काही भागात ही सेवा सुरू केली जाणार आहे.ठामपाने पुढील १0 वर्षांसाठी शहरवासियांना मोफत वायफाय सेवा देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी नागरिकांना महापालिकेकडे १00 रुपये शुल्क भरून नावनोंदणी करावी लागणार आहे. नावनोंदणी केलेल्या ठाणेकरांना ८00 केबीपीएस डेटा मोफत वापरण्यास मिळेल. यापेक्षा जास्त डेटा आवश्यक असल्यास नागरिकांना महापालिकेकडे वेगळे शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय महापालिकेच्या सर्व कार्यालयांना २0 एमबीपीएस डेटा या सेवेअंतर्गत मोफत पुरविला जाणार आहे. या योजनेतून महापालिकेस वर्षाकाठी ६१ लाखांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.रोटरी क्लब आॅफ ठाणे लेक सिटी आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथील महापालिकेच्या शाळा क्र. ९ जवळ दिव्यांगांसाठी सारथी संसाधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी त्याचे उद्घाटन झाले. त्याला नॅबचे (अंधांसाठीची राष्ट्रीय संघटना) सहकार्य मिळणार असून ठाणे परिसरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. विकास केंद्रात दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यास केंद्र राहील, अत्याधुनिक शैक्षणिक सॉफ्टवेअर, आॅडिओ लायब्ररी आणि संगणक प्रशिक्षण तसेच ब्रेल लिपीमध्ये पुस्तके उपलब्ध असतील. पुढच्या टप्प्यात या केंद्रामध्ये दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी सुटीच्या कालावधीत विशेष अभ्यासक्रम, तसेच रोजगार केंद्राची सुविधाही उपलब्ध होणार आहे. ठाण्यात अशा प्रकारचे हे पहिलेच केंद्र असून, दिव्यांगांसाठी हे उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला.