शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत एसटी सेवा, मात्र मतदान ओळखपत्र दाखवा

By अजित मांडके | Updated: August 24, 2023 16:38 IST

सध्या कोकणातील ठाणे स्थित चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.

ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी यंदा देखील लालपरीला पंसती दिली आहे. त्यानुसार एसटीच्या बस फुल्ल होत असतांनाच याच चाकरमान्यांना कोकणात मोफत पाठविण्याची सुविधा अनेक राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. त्यानुसार आपल्या बसचे आरक्षण करण्यासाठी काही राजकीय मंडळींनी मोफत तिकीट बुकींगची सेवा सुरु केली आहे. परंतु त्यात मोफत एसटी सेवा हवी असेल तर आधी आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवा अशी टाकली आहे. त्यामुळे त्याचा फायदा कदाचित आगामी निवडणुकांमध्ये मतांचा जोगवा मागण्यासाठीची ही खेळी नाही ना? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.सध्या कोकणातील ठाणे स्थित चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यानुसार यंदा एसटीच्या लालपरीला देखील अधिक पसंती दिली जात आहे. त्यानुसार एसटीने १५०० बसचे नियोजन आखले आहे. त्यात आतापर्यंत ७०० च्या आसपास बस फुल्ल झाल्याअसून त्यातही ग्रुप बुकींगला अधिक पसंती दिल्याचे दिसत आहे.त्यातही कोरोनानंतर विविध राजकीय पक्षांकडून कोकणात जाणाºया चारमान्यांसाठी मोफत बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी चारकमानी देखील आता मोफत प्रवास करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या एसटीचे तिकीटही वाढले असल्याने प्रवाशांचा देखील या मोफत सेवाला प्राधान्य देण्यासाठी पुढाकार दिसत आहे. त्यानुसार वागळे इस्टेट पासून ते अगदी दिव्या पर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी मोफत बसची सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्याचे बुकींगही सुरु केले आहे. यात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यात सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तसेच मनसे देखील ही सेवा देऊ केली आहे.त्यामुळे या पदाधिकाºयांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागण्यास सुरवात केली आहे. परंतु मोफत सेवा हवी असल्यास आधी आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र दाखवा मगच मोफत सेवेचा लाभ दिला जाईल असे सांगितले जात आहे. हे पुरावे सादर केल्यानंतर त्या चारकमान्याची माहिती ही या राजकीय पक्षांच्या कार्यालयांकडे आपसुक जमा होत आहे. त्याचा फायदा आगामी महापालिका किंवा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तुम्हाला आम्ही मोफत सेवा देतो, मग आम्हाला आमच्या नेत्याला मत द्या असे देखील सांगितले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच हे पुरावे घेतले जात असावेत अशी चर्चा सुरु आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेpassengerप्रवासी