शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांना मोफत सेवा देणारी रिक्षा!

By admin | Updated: April 21, 2016 02:18 IST

अरेरावी, उर्मट वर्तणूक देणाऱ्या रिक्षाचालकांची प्रतिमा जनमानसातून बदलावी, यासाठी रिक्षाचालक मोहन कचरे यांनी समाजकार्याचा वसा घेतला आहे

प्रज्ञा म्हात्रे,  ठाणे अरेरावी, उर्मट वर्तणूक देणाऱ्या रिक्षाचालकांची प्रतिमा जनमानसातून बदलावी, यासाठी रिक्षाचालक मोहन कचरे यांनी समाजकार्याचा वसा घेतला आहे. आपल्या वडिलांपासून हा वसा घेतलेले कचरे हे अपंगांना मोफत प्रवास सेवा देत असून प्रवाशांसाठी फ्री वायफाय, मोबाइल रिचार्ज, वैद्यकीय सुविधा, थंड पाणी आदी सर्वसोयींनी त्यांची रिक्षा सज्ज आहे. घड्याळ आणि कॅलेंडरदेखील त्यांच्या रिक्षात आहे. त्यांच्या परिसरात राहणारे शालेय विद्यार्थी मोहनकाकांच्या रिक्षाची रोजच वाट पाहत असतात.शांत स्वभावाचे आणि समाजासाठी आपले काही देणे आहे, अशी भावना मनात असलेले मोहन कचरे यांनी सर्व रिक्षाचालकांसमोर आपला आदर्श ठेवला आहे. टापटीप असलेली त्यांची रिक्षा सर्व प्रवाशांचे लक्ष वेधून घेते. त्यांच्या रिक्षातील सोयीसुविधा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. मात्र, त्यांचे कौतुक केल्याशिवाय एकही प्रवासी रिक्षातून बाहेर पडत नाही. दमूनभागून आलेल्या प्रवाशाला थंड पाणी मिळाल्यास त्याचा अर्धा थकवा तिथेच निघून जाईल, या उद्देशाने त्यांनी थंड पाण्याची बाटली रिक्षात ठेवली. तसेच, मनोरंजनासाठी फ्री वायफाय आणि एफएमचीदेखील व्यवस्था केली. एकदा रिक्षात एक प्रवासी बसले होते. त्यांना शुगरचा त्रास होता. त्यांच्या अंगाला घाम यायला लागला. आजूबाजूला काही मेडिकल शॉप न दिसल्याने कचरे यांनी धावतपळत जाऊन त्यांच्यासाठी एक चॉकलेट आणले आणि त्यांचा थोडा त्रास कमी झाला. तेव्हापासून त्यांनी चॉकलेट ठेवण्यास सुरुवात केली. प्रवासी म्हणून एखादे लहान मूल रिक्षात आल्यावर त्यालाही ते चॉकलेट देतात. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला खूप समाधान देऊन जातो, असे ते सांगतात. तसेच, अचानक कोणाची तब्येत बिघडल्यास त्यांच्यासाठी औषधेही त्यांनी आपल्या रिक्षात ठेवली आहेत. एखादेवेळी रात्रीचा प्रवास करताना मोबाइलमध्ये पैसे नसल्यास त्या प्रवाशासाठी त्यांनी रिचार्जची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे. मोबाइल रिचार्जचे मात्र ते पैसे घेतात. तसेच, रिक्षाच्या एका बाजूला त्यांनी घड्याळ आणि दुसऱ्या बाजूला कॅलेंडर ठेवले आहे. विशेष म्हणजे त्यांना स्वत:ला वर्तमानपत्र वाचण्याची आवड असल्याने एक वर्तमानपत्र त्यांनी आपल्या रिक्षात प्रवाशांसाठी ठेवले आहे. दिवसातून एक तरी अपंग प्रवासी मला भेटतो आणि त्याला मी मोफत सेवा देतो. यात मला आनंद आहे, असे कचरे सांगतात. त्यांनी आपल्या रिक्षाच्या मागे अपंगांसाठी मोफत प्रवास, असे लिहिले आहे.