शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक, ३७ लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:33 IST

बँकेत मोठ्या पदावर नोकरीला असल्याचे भासवून दोन महिलांनी ठाण्याच्या चरईतील एका महिलेच्या नातेवाइकांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ३७ लाख ८५ हजार रुपये उकळले.

ठाणे : बँकेत मोठ्या पदावर नोकरीला असल्याचे भासवून दोन महिलांनी ठाण्याच्या चरईतील एका महिलेच्या नातेवाइकांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ३७ लाख ८५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जयश्री मोहिते आणि मेघा कदम या दोन महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.ठाणे पश्चिमेतील चरई येथे वास्तव्यास असलेल्या तृप्ती परब यांना मोहिते आणि कदम या दोन महिलांनी बँकेत असल्याची बतावणी केली. परब यांचे पती, नणंद आणि भाऊ यांना कॅनरा बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत त्यांनी सुरुवातीला त्यांच्याकडून ८५ हजार रुपये घेतले. विश्वास संपादन होण्यासाठी त्यांनी हे पैसे बँकेत आॅनलाइनद्वारे वळते केले. पुढे हे काम होण्यासाठी मोठ्या अधिकाºयांनाही पैसे द्यावे लागतील, अशी बतावणी करत त्यांच्याकडून पुन्हा प्रत्येकासाठी ५० हजार ते तीन लाखांची रक्कम घेतली. कालांतराने या दोघींनीही त्यांना आपल्या घरी बोलवून पुन्हा लाखाच्या पटीत रकमा घेतल्या. यातील काही रकमा रोख तर काही धनादेशाद्वारे घेतल्या. २७ जानेवारी २०११ ते ७ आॅक्टोबर २०१३ या काळात त्यांनी परब यांच्या नातेवाइकांना बँकेत लावण्यासाठी ३७ लाख ८५ हजार रुपये घेतले. इतकी रक्कम घेऊनही तिघांपैकी कोणालाही त्यांनी बँकेत नोकरी लावली नाही. परब कुटुंबीयांनी या दोन्ही महिलांची चौकशी केल्यानंतर दोघींपैकी कोणीही बँकेत नोकरीला नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळेच या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून दोन्ही महिलांकडे पैशांचा तगादा लावला. तेव्हा त्यांनी तक्रारदारांनाच ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कुठेही तक्रार केल्यास आत्महत्या करू आणि चिठ्ठीमध्ये तुमची नावे टाकू, असाही कांगावा करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सहन करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर परब कुटुंबीयांनी अखेर १६ जानेवारीला नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.कदम आणि मोहिते या दोन्ही महिलांनी चारच दिवसांपूर्वी रेखा परब यांच्याही मुलीला बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून दोन लाख १५ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. यापूर्वीही २००८ मध्ये अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यातही दाखल झाला आहे.