शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड देण्याच्या नावाखाली केली तीन कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 06:42 IST

‘दिशा’च्या संचालकाला अटक : गुंतवणूकदारांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भूखंड देण्याची बतावणी करत राज्यभरातील २५ जणांची तीन कोटी १५ लाख ५४ हजारांची फसवणूक करणाऱ्या दिशा डायरेक्ट मार्केटिंग सर्व्हिसेस आणि यश इन्फ्राव्हेन्चर कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नाईक याला ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली. त्याला २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाण्यातील घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट येथील रहिवासी धर्मराज राव (६१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिशा डायरेक्टचा संचालक संतोष आणि त्याची पत्नी सुजाता, तसेच अन्य एक संचालक चेतन चव्हाण यांनी ठाण्यातील तीनहात नाका येथील इटर्निटी मॉलमध्ये २०१० ते २०१६ या काळात कार्यालय सुरू केले होते. याच कार्यालयातून वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याद्वारे शहापूर तसेच सातारा, कर्जत आणि कसारा याठिकाणी या प्रोजेक्टमधील प्लॉट देतो, असे सांगून वेगवेगळे प्रोजेक्ट दाखविले.  

पैसे गुंतविल्यावर दोन वर्षांच्या कालावधीनंतर गुंतवणूकदारास प्लॉट नको असल्यास त्यांनी गुंतविलेल्या रकमेच्या अर्धी रक्कम जास्त देऊन करार रद्द केला जाईल, अथवा प्लॉट पाहिजे असल्यास दोन वर्षांनंतर रितसर सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवून प्लॉट गुंतवणूकदारांच्या नावावर केला जाईल, असेही अमिष दाखविले.  दिशा डायरेक्टच्या संचालकांनी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ठरल्याप्रमाणे प्लॉट आणि भरलेली रक्कम परत न देता धर्मराज आणि त्यांच्या पत्नीची १५ लाख २३ हजार ८५० रुपयांची आणि इतर २४ गुंतवणूकदारांची तीन कोटी ३१ हजार ५९ रुपयांची अशी एकूण तीन कोटी १५ लाख ५४ हजार ९०९ रुपयांची फसवणूक केली. आरोपीला २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

‘उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करणार’  याप्रकरणी सुरुवातीला १७ गुंतवणूकदारांनी १३ ऑगस्ट २०२० रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. त्यात आणखी गुंतवणूकदारानीही तक्रार केल्याने हे प्रकरण ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने संतोष नाईक याला ५ मार्च २०२१ रोजी अटक केली. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे