शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक अधिकाऱ्याकडून फसवणूक

By admin | Updated: April 5, 2016 01:12 IST

पालघरच्या आयसीआयसीआय बँकेतील डेव्हलपमेंट आॅफिसर रघू तेजा श्रीनिवास मन्ने (२८), रा. विष्णुनगर, पालघर याने आपल्या ग्राहकांच्या ओळखीचा गैरफायदा घे

पालघर : पालघरच्या आयसीआयसीआय बँकेतील डेव्हलपमेंट आॅफिसर रघू तेजा श्रीनिवास मन्ने (२८), रा. विष्णुनगर, पालघर याने आपल्या ग्राहकांच्या ओळखीचा गैरफायदा घेत त्यांच्या फिक्स डिपॉझिट ठेवीवर परस्पर लाखो रु.चे कर्ज काढून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला रविवारी पालघर न्यायालयात हजर केले असता ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.पालघर येथील प्रकाश टॉकीजजवळील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेमध्ये डेव्हलपमेंट आॅफिसर म्हणून मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेला रघू मन्ने हा बीटेक आयटी अशा उच्चशिक्षित अधिकाऱ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून अनेक ग्राहकांना बँकेशी जोडले होते. त्यामुळे त्याचे बँकेत चांगलेच वजन होते. त्याने पालघर, बोईसरमधील अनेक ग्राहकांना बँकेतील चांगल्या व्याजाची भुरळ घालून त्यांनी लाखो रुपयांच्या फिक्स डिपॉझिट ठेवी आपल्या बँकेत ठेवल्या होत्या. बँकेतील अधिकारी संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पालघर पो.स्टे.चे सहा. पो.नि. दीपक साळुंखे यांनी आरोपीला अटक केली आहे. सन २०१४ पासून फिक्स डिपॉझिटवर कर्ज काढून त्यावर मौजमजा करायची सवय आरोपीला जडली असून आतापर्यंत आठ ग्राहकांच्या ठेवीवर कर्ज काढल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. अजूनही काही ग्राहक पुढे येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सहा. पो.नि. साळुंखे यांनी सांगितले. आरोपीच्या वडिलाने या कर्जातील ५ लाखांची रक्कम भरली आहे. (वार्ताहर)