ठाणे : परमार आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १७ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, जामीन मिळावा, यासाठी अर्ज करणाऱ्या काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि राष्ट्रवादी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. ठामपा माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, मनसे माजी गटनेते सुधाकर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नजीब मुल्ला आणि काँग्रेसचे माजी गटनेते नगरसेवक विक्र ांत चव्हाण हे १४ डिसेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची बुधवारी कोठडीची मुदत संपल्याने, ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. व्ही. बांबर्डे यांनी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले.
चौघांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ
By admin | Updated: February 4, 2016 04:22 IST