शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगर बेघर करण्याचे चार वर्षे प्रयत्न

By admin | Updated: May 26, 2016 03:13 IST

घोडबंदर श्रीनगर येथील ४५ इमारती धोकादायक ठरविण्याचे षडयंत्र गेली चार वर्षे काही राजकारणी, महापालिका अधिकारी व बिल्डर रचत आहेत. सर्वप्रथम चार वर्षांपूर्वी या इमारती

ठाणे : घोडबंदर श्रीनगर येथील ४५ इमारती धोकादायक ठरविण्याचे षडयंत्र गेली चार वर्षे काही राजकारणी, महापालिका अधिकारी व बिल्डर रचत आहेत. सर्वप्रथम चार वर्षांपूर्वी या इमारती धोकादायक ठरवण्याचा घाट घातला गेला. मात्र त्याला विरोध झाला. त्यानंतर दोन वर्षांपूर्र्वी देखील पालिकेने या इमारती धोकादायक ठरवण्याच्या हालचाली केल्या. यंदा पुन्हा तसा प्रयत्न झाल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत ठाण्यातील श्रीनगर येथील जमिनीचा विकास होऊन इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. शासनाच्या या कायद्याचे विकासकाने धिंडवडे काढल्यामुळे येथील सदनिका भूमिहीन लोकांच्या पदरात पडल्या नसल्याचा गंभीर आरोप यापूर्वी झालेला आहे. १९८६ ते १९९२ पर्यंत इमारतींचे काम पूर्ण होऊन रहिवासी वास्तव्यास आले. सेक्टर २ सर्व्हे क्र. ४२७ ते ४८५ येथील भूभागावर केवळ २० वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या इमारती धोकादायक ठरवण्याचा घाट मागील चार वर्षांपासून घातला आहे.महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करतो. या यादीमध्ये २०१३ मध्ये श्रीनगर सेक्टर २ सर्व्हे क्र मांक ४२७ ते ४८५ चे मालक म्हणून काँग्रेसच्या एका नेत्याचे नाव प्रसिध्द करण्यात आले होते. विशेष म्हणजे या यादीत श्रीनगर मधील एकही इमारतीचे नाव नव्हते. याबाबत वागळे प्रभाग कार्यालयातून अधिक माहिती घेतली असता धोकादायक इमारत फाईलमध्ये त्यावेळी या राजकीय नेत्याच्या खाजगी कंपनीचे दुमजली कार्यालय धोकादायक असल्याची नोंद केलेली होती. त्यावेळीच श्रीनगर वसाहत धोकादायक घोषित करण्याबाबत रहिवाशांनी सहाय्यक आयुक्ताकंडे आक्षेप नोंदवला होता. परंतु तरीही लागलीच पुढच्या वर्षी २०१४च्या धोकादायक इमारतींच्या यादीत पुन्हा श्रीनगर वसाहत धोकादायक जाहीर केली. यंदा कुठलीही नोटीस न देता पुन्हा इमारती धोकादायक ठरवल्या. सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. या इमारती ५४ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभ्या असून सध्या या इमारतींमधील जागा प्रति चौ.फू. १५ हजार रुपये दराने विकली जात आहे. या इमारती धोकादायक ठरवून तेथे टॉवर उभे केले तर किमान अडीच लाख चौ.फू.चे बांधकाम केले जाऊ शकते. सध्यापेक्षा जास्त दराने नव्या फ्लॅटची विक्री होणार हे उघड असले तरी सध्याचा १५ हजार प्रति चौ.फू. याच दराने फ्लॅट विकले गेले तरीही श्रीनगर वसाहतीचा पुनर्विकास राजकीय नेते व बिल्डर यांच्याकरिता किमान ३५०० कोटी रुपयांची उलाढाल असेल. त्यामुळे या इमारतींवर गेली चार वर्षे डोळा असण्यामागे हे अर्थकारण हेच कारण आहे. श्रीनगरमधील रहिवासी जागरूक असल्याने व यापूर्वी दोनवेळा त्यांच्या इमारती धोकादायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांनी महापालिकेतील गोल्डन गँगच्या कारवायांविरुद्ध आवाज उठवल्यावर नजरचुकीने इमारती धोकादायक ठरवल्या गेल्याची सारवासारव अधिकारी करु लागले आहेत. मात्र एक-दोन नव्हे तर चक्क ४५ इमारती धोकादायक ठरवणे ही नजरचूक असूच शकत नाही, असे रहिवाशांचे मत आहे. (प्रतिनिधी)नगरसेवकाची मृत आई झाली मालमत्ताधारकविशेष म्हणजे २०१३, २०१४ च्या धोकादायक यादीत किसननगरमध्ये असलेल्या एका काँग्रेस नगरसेवकाच्या धोकादायक इमारतीच्या मालमत्ताधारक यादीतून अचानक नगरसेवकाचे नाव काढून त्यांच्या मयत आईचे नाव २०१५ च्या यादीत टाकण्यात आले. ही बाब उघड झाल्यावर आता ही चूकही पालिकेकडून मान्य केली गेली. अशा अक्षम्य चुका करणाऱ्यांवर आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल कोणती कारवाई करतात याकडे श्रीनगरमधील रहिवाशांसह ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.