शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

By admin | Updated: June 22, 2016 02:00 IST

पावसाच्या सुरूवातीलाच झालेल्या दुर्घटनेत एका मुलाचा बळी गेला. पाऊस पडत असतानाचा भार्इंदर पश्चिमेच्या भोलानगरमध्ये उघड्यावरच असलेल्या मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन

मीरा रोड : पावसाच्या सुरूवातीलाच झालेल्या दुर्घटनेत एका मुलाचा बळी गेला. पाऊस पडत असतानाचा भार्इंदर पश्चिमेच्या भोलानगरमध्ये उघड्यावरच असलेल्या मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन तीन घरांना आग लागली. यात एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. तर तिघेजण किरकोळ जखमी आहेत. सुदैवाने गॅससिलींडरचे स्फोट झाले नाहीत. अन्यथा संपूर्ण झोपडपट्टीच कांदिवलीच्या दामूनगरप्रमाणे बेचीराख झाली असती. भोलानगरमधील शंकर मंदिराच्यामागे गल्ली क्रमांक १३ आहे. संपूर्ण गल्लीतील खोल्यांना वीज पुरवठा करणारे दोन मीटर बॉक्स सुरूवातीच्या खोल्यांना लागूनच आहेत. त्यावरील मुख्य स्वीच बोर्ड तर उघड्यावरच आहेत. मंगळवारी पहाटेपासून पाऊस पडत होता. तोच सकाळी साडेनऊच्या सुमारास येथील मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट होऊन तीन खोल्यांना आग लागली. येथील दोन खोल्या रामबचन चौधरींच्या आहेत. तर एका खोलीत विश्वकर्मा कुटुंब तर दुसऱ्या खोलीत चौधरी कुटुंब भाड्याने राहते. तर तिसऱ्या खोलीत दशमी गुप्ता (५५) यांचे कुटुंब राहते. विश्वकर्मा यांच्या घराला आग लागली असता घरात एकट्याच असलेल्या सुधा (२६) या गंभीर भाजल्या आहेत. त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. तर गुप्ता कुटुंबातील दशई यांच्यासह त्यांचा मुलगा सोनू (३५) हे किरकोळ भाजले. मात्र सोनूचा मुलगा मोहित उर्फ छोटू (४) गंभीर भाजला. या शिवाय तिसऱ्या खोलीतील सचिन चौधरी (१६) हा भाडेकरु किरकोळ भाजला. आग लागताच परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. रहिवाशांनी त्याआधीच पाचही जखमींना भीमसेन जोशी रुग्णालयात नेले. गंभीर अवस्थेत असलेल्या सुधा व मोहितला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. यात उपचारा दरम्यान मोहितचा मृत्यू झाला. तर सुधाची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. (प्रतिनिधी) रहिवासी, रिलायन्स एनर्जीचे दुर्लक्ष पावसाळा सुरु झाला असताना येथे उघड्यावर व दाटीवाटीने असलेली विजेची मीटर व मुख्य स्वीच बोर्ड पाहूनच भीती वाटते. अनेक वर्षापासून अशीच परिस्थिती आहे. रहिवाशांसह रिलायन्स एनर्जीने केलेले दुर्लक्षही या घटनेला व मोहीतच्या बळीला कारणीभूत ठरले आहेत. महापालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयाचे उद्घाटन करुन ५ महिने झाले तरी अद्यापही येथे आॅपरेशन थिएटर नाही. जळीत रुग्णावर उपचार करण्याची सुविधा नाही. येथे उपचाराची सोयच नसल्याने गंभीर अवस्थेतील रुग्णास कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात पाठवले जाते.