शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाच्या दोन अपघातांमध्ये चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:53 IST

दोन रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल : तीन जखमी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयांत दाखल

ठाणे : रिक्षाच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघे जण जखमी झाल्याची घटना घोडबंदर रोड येथे घडली. याप्रकरणी वर्तकनगर आणि चितळसर या दोन पोलीस ठाण्यांत दोन रिक्षाचालकांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.पहिल्या घटनेत भिवंडीच्या काल्हेर येथील रहिवासी रंगनाथ खटाळे हे कॅडबरी सिग्नलजवळून ज्युपिटर रुग्णालयाकडे जाणाऱ्या सेवारस्त्याने २६ आॅगस्टला रात्री ११.५० वाजता पायी जात होते. त्यांना एका रिक्षाने मागून धडक दिली. यात त्यांच्या दोन्ही पायांच्या पंजाला आणि गुडघ्याला मार लागला. याप्रकरणी त्यांनी अनोळखी रिक्षाचालकाविरुद्ध २७ आॅगस्टला वर्तकनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक डी.आर. कुंभार अधिक तपास करत आहेत.पोखरण रोड क्रमांक दोन, गांधीनगर शिवसेना शाखेच्या समोरील रस्त्यावर २३ आॅगस्ट रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाºया रिक्षाची एका दुभाजकाला धडक बसली. या अपघातामध्ये रिक्षातील तारा यादव (३३), जयप्रकाश दुबे (३३) आणि सीमा दुबे (३५, तिघे रा. चिरागनगर, ठाणे) हे जखमी झाले. यात तारा यांचे तीन दात तुटले. त्यांना ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले.चितळसर पोलिसांत अनोळखी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.