शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार नागरिक २८ तास विजेविना, खांब पडल्याचे निमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:55 IST

बदलापूर शहरात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकदा नागरिकांना बसत असतो.

बदलापूर : बदलापूर शहरात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकदा नागरिकांना बसत असतो. गुरुवारी बदलापूर पश्चिमेतील पोखरकरनगर भागात क्रेनच्या धडकेत दोन खांब पडल्यानंतर तब्बल १० तासांनी त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. मात्र, रात्री उशीर झाल्याने काम थांबवण्यात आले. त्यामुळे २४ तासांहून अधिक काळ चार हजारांहून अधिक नागरिकांना विजेविना राहावे लागले. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला.बदलापूरमध्ये महावितरणच्या कारभारामुळे नव्याने येथे आलेल्या नागरिकांना त्रास होत आहे. निवासी संकुलात विविध प्रकारच्या सोयीसुविधा असल्या, तरी विजेविना त्याचा फायदा शून्य आहे. यातच गुरुवारी पश्चिमेतील पोखरकरनगरच्या रस्त्याला असलेल्या विजेच्या खांबांना एका खाजगी क्रेनची धडक लागल्याने दोन खांब पडले. त्यामुळे दुपारी दीडच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी क्रे नमालकाने दुरुस्तीचे आश्वासन दिले खरे, मात्र काही वेळातच त्याने घटनास्थळावरून पोबारा केला. त्यामुळे महावितरणच्या संबंधित अभियंत्याने पोलीस ठाणे गाठत तक्र ार दिली. मात्र, तक्र ार देण्यात एक अभियंता अडकलेला असताना वरिष्ठ अधिकाºयाने या प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे होते. मात्र, चार हजार नागरिकांच्या विजेचा प्रश्न सोडवण्याऐवजी बैठकांचे सोपस्कार पार पाडण्यात वरिष्ठ अभियंते अडकले होते. त्यामुळे तक्र ार करून रात्री १० च्या सुमारास टोकावडे येथून आलेल्या दुरुस्ती पथकाने खांब उभे करण्याचे काम सुरू केले.रात्री उशिरापर्यंत विजेचे खांब उभे करण्याचे काम झाले. मात्र, उच्चदाब वाहिन्या घटनास्थळाच्या बाजूने जात असल्याने वीजवाहिन्या टाकणे शक्य नसल्याचे सांगत काम थांबवण्यात आले. त्यामुळे पोखरकरनगर, पाटीलनगर येथील जवळपास चार हजार नागरिकांना फटका बसला. वीज नसल्याने पाण्याचे नियोजनही कोलमडले. शुक्र वारी जवळपास सर्वच घरांत ठणठणाट होता. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.