शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

चार देशी पिस्तुले जप्त

By admin | Updated: June 30, 2017 02:43 IST

डोंबिवलीपासून अंबरनाथ-बदलापूरपर्यंतच्या गुन्हेगारांना शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आजमगढ येथील तस्कराच्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : डोंबिवलीपासून अंबरनाथ-बदलापूरपर्यंतच्या गुन्हेगारांना शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आजमगढ येथील तस्कराच्या मुसक्या आवळण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला बुधवारी यश आले. पोलिसांनी त्याच्याकडून काडतुसांसह चार पिस्तुले हस्तगत केली आहेत. कल्याण न्यायालयाने त्याला ३ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शफिक हाबीब अन्सारी (२२, रा. आमपाडा, भिवंडी) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. कल्याण-शीळ महामार्ग आणि बदलापूर पाइपलाइन रोड जोडणाऱ्या काटईनाक्यावर शस्त्रसाठ्यासह तस्कर येणार असल्याची माहिती कल्याण शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, फौजदार पवन ठाकूर, फौजदार नितीन मुधगुन, दत्ताराम भोसले, विलास मालशेटे, राजेंद्र खिलारे आणि अजित राजपूत यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळपासून नाक्यावर सापळा रचला होता. जवळपास तासाभराच्या प्रतीक्षेनंतर एक तरुण तेथे आला. पोलिसांनी त्याला घेराव घातला. अंगझडतीच्या वेळी काही रकमेसह आजमगढ ते कल्याण असे प्रवासाचे तिकीट सापडले. पाठीवरील बॅगची झडती घेतली असता कापडी पिशवीत निळ्या रंगाच्या जीन्स पॅण्टमध्ये गुंडाळून ठेवलेली चार देशी बनावटीची पिस्तुले आणि प्लास्टिकच्या पिशवीत चार जिवंत काडतुसे आढळली. या सर्व शस्त्रांची किंमत बाजारपेठेत ६० हजार ८१० रुपये आहे. याप्रकरणी हवालदार भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात अन्सारीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, डोंबिवलीत मे महिन्यात विविध गोळीबारांच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी केलेली कारवाई मोठी मानली जात आहे.