शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या डबक्यात वीजेचा शॉक लावून मासेमारी, आतापर्यंत अनेकांचा गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 01:35 IST

शहापूर तालुक्यातील सर्वच नद्या सध्या आटल्याने डबक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू असून ही मासेमारी जाळ्याने नाही तर चक्क वीजेचा शॉक देऊन केली जात आहे.

भातसानगर : शहापूर तालुक्यातील सर्वच नद्या सध्या आटल्याने डबक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू असून ही मासेमारी जाळ्याने नाही तर चक्क वीजेचा शॉक देऊन केली जात आहे.तालुक्यातील केवळ भातसा नदी पाहता सर्वच नद्या आटून गेल्या आहेत. तर ज्या काही नद्या कधी आटल्याचे पाहिले नव्हते, त्या अखेरच्या घटक मोजत आहेत. त्यांच्या खोलगट भागात डबक्यात अजूनही पाणी शिल्लक आहे. या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे असल्याने सध्या काळू, शाई नदी सारख्या नद्यांमध्ये रात्रंदिवस मासेमारी सुरू असूनही मासेमारी इतकी भयानक आहे.वीजेच्या पोलवरून वीजेच्या तारांना वायर जोडून त्या वायर दूरवर नदीत नेल्या जात आहेत. त्या सुकलेल्या दोन काठ्यांच्या दोन्ही बाजूच्या टोकांना दोरी बांधून मध्ये वायर लावून ती सोलून तिला शॉक दिला जातो. या काठ्या जितक्या दूरवर नेता येतील तितक्या त्या न्यायच्या. या तारेच्या संपर्कात जेवढे जीव येतील तेवढे तात्काळ त्या शॉकने मरून जातात. मात्र, जर का अनवधानाने ही तार काढणारा बेसावध राहिला तर मात्र मासेमारी करणारे आपला जीव गमावून बसण्याची मोठी शक्यता आहे.सापगाव, खुटघर, सरलांबा, शाई, मढ, चिरव यासारख्या अनेक गावांमधील लोक शॉक लागून मृत्यूमुखी पडल्याची उदाहरणे समोर असतानाही आजही अशा प्रकारची मासेमारी केली जात आहे. शनिवार, रविवारी या प्रकारच्या मासेमारीला तर उधाणच येते.या प्रकारच्या मासेमारीमुळे जलसंपदाही ही धोक्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मासेमारीवर कडक नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. या बाबीकडे वीज कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे.आज तालुक्यातील सर्वच नदी पात्रात वीजेचे शॉक लावून मासेमारी केली जाते. मात्र, ती अतिशय जीवघेणी असल्याने अशी मासेमारी कुणीही करू नये.- जयराम शांताराम भोईर, सामाजिक कार्यकर्तेविजेच्या खांबावरून वायरिंग जोडून शॉक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल.- अविनाश कटकवार,अभियंता, महावितरण 

टॅग्स :thaneठाणे