शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भिवंडीत कचराकुंडीत सापडले आधारकार्ड; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:37 IST

निवडणुकीत गैरवापर होण्याची भीती, प्रांताधिकारी देणार अहवाल

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातील अजयनगर परिसरात कुचराकुंडीत सुमारे साडेतीनशे आधारकार्ड सापडल्याच्या चर्चेमुळे जिल्ह्यात तर्कवितर्क काढले जात आहेत. याची वेळीच दखल घेऊन भिवंडी उपविभागीय अधिकाऱ्यांना तत्काळ चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहे.निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार पाठिशी न घालता त्यासंदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच दिले आहेत. दरम्यान, भिवंडीच्या अजयनगरमधील कचराकुंडीत सुमारे तीनशे ते साडेतीनशे आधारकार्ड सापडले आहेत. या घटनेस अनुसरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या कालावधीत जिल्हा प्रशासनानेही कचराकुंडीत मोठ्याप्रमाणात सापडलेल्या या आधारकार्डच्या चौकशीचे आदेश भिवंडीचे उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांना दिले आहेत. त्यामुळे संबंधीत आधारकार्ड बनावट आहे का, एवढ्या मोठ्याप्रमाणात कुंडीत सापडलेले कार्ड कशासाठी व कोणाकडे होते, या आधारकार्डवरील व्यक्ती अस्तित्वात आहेत की नाही आदी विविध प्रश्नांची उत्तरे चौकशीतून उघडकीस होण्याची शक्यता आहे.आधारकार्ड जर बनावट असतील, तर त्यांचा बोगस मतदानासाठी वापर होणार होता की काय अशी चर्चाही या प्रकरणाने जिल्ह्यात सुरू आहेत. जिल्हा प्रशासनानेही या आधारकार्डचा विषय गांभीर्याने घेऊन उपविभागीय अधिकाºयांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश जारी केले. आचारसंहिता लागण्याच्या आधी आधारकार्ड कुंडीत सापडले आहेत. प्राप्त झालेल्या आदेशास अनुसरून निवडणुकीच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाºयांच्या मंगळवारी बैठका घेण्यात आल्या असता त्यात याविषयी चर्र्चा झाली. याबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे. सर्व मुद्यांवर चौकशी करुन त्याविषयीचा सविस्तर अहवाल लवकरच वरिष्ठांना पाठवण्यात येणार असल्याचे नळदकर यांनी सांगितले.आधारकार्डधारकांचा पोलिसांकडून शोधकचरा कुंड्यांमध्ये सापडलेले आधारकार्ड २०१५ सालचे आहेत. भिवंडी शहरातील खडक रोड, कोंबडपाडा, अजयनगर, गोकूळनगर आदी ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या नावाची आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी सुमारे ३०० ते ३५० आधारकार्ड कचराकुंडीतटाकणाºयांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्याविषयी सखोल चौकशी करण्यासाठी आधार कार्डवरील छायाचित्रांच्या सहाय्याने संबंधित कार्डधारकांचा शोध घेतला आहे. आता याप्रकरणी प्रशासन नेमका कसा चौकशी अहवाल देऊन कुणावर कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड