शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गढूळ पाणीपुरवठा, मनसेचा पालिका मुख्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:09 IST

पुन्हा आंदोलनाचा इशारा : अधिकाऱ्यांना दूषित पाण्याच्या बाटल्या भेट

ठाणे : एकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. मात्र, दुसरीकडे ठाणेकरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वरनगरातील रहिवाशांना मागील पाच ते सहा महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. या विरोधात बुधवारी मनसने महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी अधिकारी आणि पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाला गढूळ पाण्याच्या बाटल्याही भेट म्हणून दिल्या.

शहर अभियंता रवींद्र खडताळे यांनी येत्या तीन दिवसांत ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले असले तरी सात दिवसांत जर ही समस्या नाही सोडवली तर अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना हे गढूळ पाणी पाजले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. यावेळी पोलिसांनी मनसेच्या १० जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.येथे होतो दूषित पाणीपुरवठा

स्मार्ट ठाण्यात ठाणेकरांना गढूळ पाणी प्यावे लागत असून ही गंभीर समस्या ज्यांच्या समोर मांडायची आहे ते पाणी खात्याचे उपअभियंता अर्जुन अहिरे सुटीवर असल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यांनी थेट आयुक्त कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिला. मात्र, स्वत: नगर अभियंता पाण पुरवठा विभागात आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे समस्या मांडली. वागळे, पाचपाखडी, वर्तकनगर, म्हाडा, लोकमान्यनगर, ज्ञानेश्वरनगर अशा अनेक भागात गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी यावेळी शहर अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :MNSमनसे