शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजी शहरप्रमुखाची शेतकऱ्याला दमदाटी

By admin | Updated: January 24, 2017 05:36 IST

उत्तन-गोराई वेशीवर असलेल्या सावंतवाडी गावातील सावंत या शेतकरी कुटुंबाने शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्यासाठी काही दिवसांपूर्वी

राजू काळे / भार्इंदरउत्तन-गोराई वेशीवर असलेल्या सावंतवाडी गावातील सावंत या शेतकरी कुटुंबाने शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्यासाठी काही दिवसांपूर्वी पश्चिमेच्या भाजीबाजारात आणला होता. त्याला शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गजेंद्र रकवी यांनी विरोध केला. यामुळे निर्माण झालेला वाद भार्इंदर पोलिसांत गेला. तेथे दोन्ही बाजूकडील व्यक्तींवर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. यामागे रकवीच असल्याचा आरोप नौटियाल यांनी केला. आता त्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी भाजीविक्री बंद केली. सावंत कुटुंबाने आपल्या पडीक जमिनीवर भार्इंदर येथील रहिवासी अनिल नौटियाल यांच्या सहकार्याने पुन्हा भाजीपाल्याची लागवड सुरू केली. शेतात चांगल्या दर्जाचा भाजीपाला पिकल्याने अनिल यांनी भार्इंदर येथील भाजीपाला विक्रेत्यांना शेतातील भाजीपाल्याची घाऊक विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांनी भार्इंदर पश्चिमेकडील पोलीस ठाण्यालगत असलेल्या काही परप्रांतीय भाजीविक्रेत्यांना सावंत यांच्या शेतात नेले. विक्रेत्यांनी सध्या भाजीचे उत्पादन अधिक झाल्याने भाजीपाल्याचा दर कमी झाल्याचा दावा करीत भाजीच्या प्रतिजुडी वा नगामागे १ रुपयाप्रमाणे दर देण्यास संमती दर्शवली. हा दर अत्यल्प असून त्यातून शेतीचा खर्चही भागणार नसल्याने नौटियाल व सावंत यांनी स्वत:च थेट ग्राहकांना भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. दि. ११ जानेवारीला त्यांनी शेतातील ताजा भाजीपाला थेट भार्इंदर पश्चिमेकडील बाजारात विकण्यास सुरुवात केली. ग्राहकांना ताजा भाजीपाला अन्य विक्रेत्यांकडील भाजीपाल्यापेक्षा स्वस्त दरात मिळू लागल्याने त्यांना मोठ्याप्रमाणात ग्राहक मिळू लागले. राज्य सरकारच्या ‘सावतामाळी योजनेंतर्गत’ सावंत यांच्या भाजीपाला थेट ग्राहकांना विकण्याच्या संकल्पाची प्रसिद्धिमाध्यमांनी दखल घेतली. सुरुवातीला भाजीपालाविक्रीची हातगाडी लावण्यास काहींनी विरोध केला. सावंत यांनी सिराज अहमद हसनअली सिद्दीकी या स्थानिकाच्या मदतीने येथील शिवसेना शाखेजवळ भाजीविक्रीला सुरुवात केली. त्याला सेनेचे माजी शहरप्रमुख रकवी यांनी विरोध करून हातगाडी कोणाला विचारून लावली, असा सवाल केला. त्यावर, अनिल यांनी आपण शेतकऱ्याचा भाजीपाला थेट ग्राहकांना स्वस्त दरात विकत असल्याने त्याला सहकार्य करण्याची विनंती रकवी यांना केली. मात्र, शाखेसमोर उत्तन परिसरातील भाजीविक्रेत्या महिलांनी सिद्दीकी याला धक्काबुक्की करून सावंत यांचा भाजीपाला फेकून दिला.