शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
4
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
5
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
6
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
7
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
8
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
9
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
10
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
12
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
13
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
14
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
15
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
16
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
17
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
18
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
19
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
20
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले

अमली पदार्थ विकणाऱ्या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यास तरुणीसह अटक 

By धीरज परब | Updated: May 7, 2024 12:24 IST

निहाल हा एका गाडीच्या आडोशाला संशयास्पदरित्या हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन उभा असल्याचे दिसून आला. 

मीरारोड - मीरा भाईंदर भाजपाचा माजी पदाधिकारी निहाल एजाज खान ( वय ३६ वर्षे ) रा . मुन्शी कंपाउंड , काशीमीरा  ह्याला गांजा विकताना मीरारोड पोलिसांनी अटक केली असून त्याच्या सह तरुणीला सुद्धा पकडले आहे . दोघांना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. गाडी मधून फिरून गांजा विक्री करायचा व गांजा वजन करण्यासाठी तराजू गाडीत ठेवायचा . 

मीरारोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर हे त्यांच्या पथकासह गस्त घालत असताना  शिवार उद्यान येथील सरदार वल्लभाई पटेल शाळेच्या मार्गावर ३ मे च्या रात्री ७ च्या सुमारास निहाल हा एका गाडीच्या आडोशाला संशयास्पदरित्या हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन उभा असल्याचे दिसून आला. 

देवकर यांनी  त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला असतानाच त्याला पकडले . त्यावेळी त्याच्या मारुती एर्टिगा एमएच ०४ केएल ३६३२ ह्या  गाडीत बसलेली तरुणी पळून गेली . पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या कडे लहान प्लास्टिक पिशव्यां मध्ये विक्रीसाठी भरलेला सुमारे ८०० ग्राम गांजा तर एका पिशवीत ७६५ ग्राम गांजा सापडला . शिवाय २ मोबाईल , गांजा मापण्यासाठी वजन काटा , ४ हजार ३०० रोख , प्लास्टिक पिशव्या असा एकूण ४ लाख ४० हजारांचा  मुद्देमाल मिळून आला. 

पोलिसांनी त्याच्या ४ लाख किमतीच्या गाडी सह गांजा , मोबाईल , वजन काटा ,रोख आदी सर्व जप्त केला . निहालच्या चौकशी नंतर पोलिसांनी गाडीतून पळून गेलेल्या सपना उर्फ शायदा सियासत खान ( २६ )  रा . मुन्शी कंपाउंड हिला देखील अटक करून दोघांवर ४ मे रोजी अमली पदार्थाच्या विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला . 

निहाल हा भाजपाचा माजी युवा जिल्हा सचिव असून सपना ही त्याची सावत्र मुलगी आहे . तिच्यावर ह्या आधी देखील अमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल आहे . निहाल व सपना ह्या दोघांना ठाणे न्यायालयाने ८ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे . सहायक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर हे सदर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. निहाल जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट चा अध्यक्ष आहे . तसेच अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती चा तो महाराष्ट्राचा सहसचिव म्हणवतो . भाईंदर येथे पत्रकार सांगून अनधिकृत बांधकामात खंडणी उकळणाऱ्या भाजपाचा पदाधिकारी संजय ठाकूर विरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्यास अमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी अटक कारण्यात आली आहे .