शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरच्या ढाब्यावरुनही विदेशी मद्य जप्त

By admin | Updated: July 5, 2017 20:10 IST

गावठी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या ठाण्यातील ठाण्यातील एका महिलेला कापूरबावडी पोलिसांनी तर बदलापूरातील नामदेव पुजारे या दुचाकीस्वाराला राज्य

आॅनलाइन लोकमतठाणे, दि. 05 - गावठी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या ठाण्यातील ठाण्यातील एका महिलेला कापूरबावडी पोलिसांनी तर बदलापूरातील नामदेव पुजारे या दुचाकीस्वाराला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. बदलापूरातील एका ढाब्यासह गावठी दारुच्या अड्डयावरही या पथकाने मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी कारवाई केली. यात दोघांना अटक करण्यात आली असून गावठी दारुसह एक लाख ३३ हजार २७५ रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.अंबरनाथ बदलापूर भागातील ढाब्यांवरच बेकायदेशीरपणे मद्य विक्री खुलेआमपणे सुरु असल्याबाबत ‘हायवेवरील ढाब्यांवर बेकायदेशीर बार’ या मथळयाखाली ‘लोकमत’ने ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’ हे विशेष वृत्त ३ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी तसेच अंबरनाथ येथील पथकाने आठ ढाब्यांवर कारवाई करुन आठ जणांना अटक केली. यात तिघे जण पसार झाले होते. दरम्यान, बुधवारी पुन्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नाना पाटील, अंबरनाथचे निरीक्षक एस. आर. लाड, दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील आणि आर. ए. जाधव यांच्या पथकाने बदलापूर पश्चिम भागातील एरंजाड गावातील आई एकवीरा ढाबा येथे बेकायदेशीरपणे मद्य विक्री करणाऱ्या गिरीश मेहेर याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. त्याच्याकडून २.५२ बल्क लीटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले. तर बदलापूरच्या कर्जत रोडवरील सुभाषनगर भागात एका दुचाकीवरुन गावठी दारुची विक्री करणाऱ्या नामदेव पुंजारे (रा. मानकीवली गाव, बदलापूर) याला बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून त्याच्याकडून ४० लीटर गावठी दारु जप्त करण्यात आली. या दोन्ही कारवाईत ४४ हजार ७५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तर तिसरी कारवाई बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अंबरनाथ तालुक्यातील मंगरुळ आणि ढोके गावात निरीक्षक लाड यांच्या पथकाने दोन बेवारस गावठी अड्डयांवर केली. यात ८४ हजारांचे चार हजार २०० लीटर रसायन, एक भट्टी असा ८९ हजार २०० चा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, कापूरबावडी पोलिसांनीही चितळसर भागात गावठी दारु विक्री करणाऱ्या सीता यादव (५५) या महिलेला शाळा क्रमांक ११३ च्या परिसरातून ४ जुलै रोजी रात्री १०.४५ वा. च्या सुमारास अटक केली. तिच्याकडून दहा लीटर गावठी दारु हस्तगत करण्यात आली असून तिच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.