शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जबरी चोरी, घरफोडी गहाळ झालेले ९८ मोबाइल हस्तगत; अन्य एका प्रकरणात एक सराईत आरोपी अटकेत

By अजित मांडके | Updated: March 1, 2023 17:48 IST

मागील काही दिवसात नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

ठाणे : नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी तसेच गहाळ झालेले मोबाइल अशा घटना मोठ्या प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी येत्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी तपास करुन ९८ मोबाइल हस्तगत केले आहेत. यात घरफोडीचे ७, चोरीचे ४, जबरी चोरी २ आणि इतर १७ असे मिळून ९८ मोबाइल हस्तगत केले आहेत. तर दुसºया एका घटनेत घरफोडी चोरी, मोटारसायकल व लॅपटॉप चोरी करणाºया सराईत आरोपीसही मुद्देमालासह अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त गणेश गावडे यांनी दिली. त्याच्याकडून ४ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मागील काही दिवसात नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानुसार परिमंडळ एक चे पोलीस उपआयुक्त गणेश गावडे यांनी दिलेल्या सुचनेच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे, वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या टीमने सीईआयआर पोर्टल व आॅनलाईन उपलब्ध टुल्स, मोबाइल शोध अ‍ॅपचा वापर करुन लोकशेन ट्रेस करुन तब्बल ९८ मोबाइल हस्तगत केले आहेत. यात कनार्टक ०१, उत्तरप्रदेश ०३, मध्यप्रदेश ०२, गुजरात ०१, मुंबई शहर ०५, लातुर ०१, पूणे ०२ आणि जालना, बीड येथून १ अशा पध्दतीने इतर जिल्हे आणि राज्यातून देखील मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

दुसऱ्या एका घटनेत नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० फेब्रुवारी रोजी फिर्यादी हे आपल्या परिवारासह राहत्या घरात दरवाजा बंद करुन झोपले असतांना अज्ञात चोराने घरात प्रवेश करुन १६ हजार रुपये किमंतीचे ४ मोबाइल फोन चोरी करुन पळून गेला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घटनास्थळावरील मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ३ टीम तयार करुन घटनास्थळापासून मुंब्रा पर्यंतचे सुमारे ३० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करुन  मिळालेल्या माहितीच्या आधारे सलग तीन दिवस मुंब्य्रात आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर शिताफीने अब्दुल समद नुरमोहम्मद सखानी (२७) रा. कौसा, मुंब्रा याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, ५ मोबाइल, एक लॅपटॉप, दोन मोटारसायकल असा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्याच्या विरोधात नौपाडा ४, कळवा १ व ठाणेनगर १ असे एकूण ६ गुन्हे उघड करण्यात आले आहेत. त्याच्याकडून ५ मोबाइल फोन, एक लॅपटॉप, दोन दुचाकी असा ४ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणे