शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या फायलींना फुटणार नाहीत पाय

By admin | Updated: December 9, 2015 00:42 IST

फाईल गहाळ होणे, एकाच विभागात फाईल पडून राहणे, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकरवी फाईल या विभागातून त्या विभागात परस्पर हलविणे आदीं गोष्टींना आता चाप

अजित मांडके, ठाणे फाईल गहाळ होणे, एकाच विभागात फाईल पडून राहणे, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकरवी फाईल या विभागातून त्या विभागात परस्पर हलविणे आदीं गोष्टींना आता चाप बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यापासून निविदा काढणे, एखाद्या विषया संदर्भातील नोंदी घेणे आदी सर्व कामे आॅनलाईन म्हणजेच संगणकाच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. महापालिका मुख्यालयासह १० प्रभाग समिती कार्यालये आता संगणकाच्या माध्यमातून एकाच छताखाली जोडली जाणार आहेत. त्यामुळे फाईल गहाळ होणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेतही हा प्रयोग राबविला जाणार आहे. स्मार्टसिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने शहरासासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. परंतु आता शहर स्मार्ट करतांना पालिकेचे प्रत्येक कार्यालय, कर्मचारी आणि अधिकारी वर्ग हा संगणकाच्या माध्यमातून स्मार्ट केला जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्याचे काम सुरु करण्यात आले असून या टप्यात मुख्यालयातील सर्व विभाग हे एकाच छताखाली आणले जाणार आहेत. यापूर्वी पालिकेचा सर्व कारभार हा कागदांच्या सहाय्याने केला जात होता. त्यामुळे फाईल गहाळ होणे, महापालिका मुख्यालयात ठेकेदाराच फाईल घेऊन फिरणे, एकाच टेबलावर दिवेंसदिवस फाईल पडून राहणे असे प्रकार घडत होते. परंतु या सर्वांवर आता तोडगा काढण्यात आला असून यातून पालिकेचा कारभार पेपरलेस करुन, अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून असलेल्या फाईलींचा पसाराही कमी होणार आहे.