शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

ग्रामीण भागाच्या विशेष पॅकेजसाठी पाठपुरावा

By admin | Updated: November 12, 2015 01:19 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सन २०१५ ची निवडणूक लढविताना पक्षाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सन २०१५ ची निवडणूक लढविताना पक्षाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतानाच ग्रामीण भागासाठी विशेष पॅकेजकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार, अशी ग्वाही केडीएमसीचे नवनिर्वाचित महापौर राजेंद्र देवळेकर यांनी बुधवारी दिली आहे.कल्याण-डोंबिवली शहर आणि परिसरातील स्वच्छता, वाहतूककोंडी सोडविणे, मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाची व डांबरीकरणाची कामे पूर्णत्वास नेणे, यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. याखेरीज, ठाकुर्ली टर्मिनस, कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता, डोंबिवली-माणकोली खाडीपुलाचे काम, स्मार्ट सिटी आणि त्यासंदर्भातील शासनाच्या योजना व निधी, टिटवाळा रिंग रोड, वालधुनी नदी प्राधिकरण व सुशोभीकरण, गोविंदवाडी बायपासचे उर्वरित काम आदी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कचरा डम्पिंगची समस्या लक्षात घेता कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावला जाईल. त्याचबरोबर शहरातील सिग्नल यंत्रणा आणि कल्याण पूर्वेतील स्कायवॉक पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करणे, ही उद्दिष्टे पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.महापालिकांच्या रुग्णालयांत चांगल्या सेवा मिळाव्यात तसेच परिवहन सेवेचा विस्तार आणि सक्षमीकरण, फिश मार्केट, वारकरी भवन, महिला उद्योग केंद्र, डायलेसिस सेंटर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, बोटॅनिकल गार्डन याचबरोबर महापालिका क्षेत्रातील चाळींचा पुनर्विकास, धोकादायक इमारती, जुन्या इमारती यासाठी शासनाकडे वाढीव एफएसआयची मागणी, आवास आणि बीएसयूपी योजना यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले. विशेष बाब म्हणजे वायफाय यंत्रणा व लोकसहभाग वाढविण्यासाठी सोशल मीडिया हेल्पलाइन तसेच महिला सुरक्षेसाठी विशेष अ‍ॅप्स तयार करणार असल्याचेही या वेळी त्यांनी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेना यांच्यापैकी कुणालाही मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलेले नाही, याचा अर्थ विकासासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असे लोकांचे मत आहे. याची नोंद घेत पक्षश्रेष्ठींनी युती केली असून आगामी काळात शहरांचा विकास केला जाईल. -कपिल पाटील, खासदार, भिवंडीकल्याण पूर्वेत भाजपाला जे अभूतपूर्व यश मिळाले, त्यातून नागरिकांना बदल अपेक्षित होता, हे स्पष्ट होते. नवनिर्वाचित उपमहापौर कल्याण पूर्वेचा असल्याने या मतदारसंघात येणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि त्याचसोबत नागरिकांचे राहणीमान उंचावणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. - गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्वकल्याण-डोंबिवलीकरांना धन्यवाद द्यायला आलो असून शिवसेनेच्या कामाची परंपरा नवीन महापौर कायम ठेवील. आमचा महापौर होणारच होता, मात्र सगळे मिळून विकास करू या म्हणून भाजपासोबत एकत्र आलो आहे. कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजची रक्कम आता त्यांनी द्यावी. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख शिवसेना