शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेमिंगोंना ठाणे खाडीकिनाऱ्याचा मोह आवरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:12 IST

पक्षिप्रेमींना घेता येणार आनंद, हंगाम संपत आला तरी दर्शनाची संधी

- स्नेहा पावसकर ठाणे : फ्लेमिंगो सॅन्च्युअरी (अभयारण्य) म्हणून घोषित केलेल्या ठाणे खाडीकिनारी एप्रिल महिन्याचा शेवट आला की, फ्लेमिंगोंची संख्या कमीकमी होत जाते. परंतु, यंदा एप्रिलचा शेवट आला अर्थात हंगाम संपत आला असला, तरीही सुमारे ५० ते ६० हजार फ्लेमिंगो येथे पाहायला मिळत आहेत आणि पक्षिप्रेमींना याचा आनंद लुटता यावा, यासाठी एक फेरीबोटही सुरू केली आहे.मुंबईतील विविध खाडीकिनारी फ्लेमिंगोंचे दर्शन नोव्हेंबरपासून घडते. त्यातही ठाणे खाडी हे फ्लेमिंगो सॅन्च्युअरी (अभयारण्य) असून येथे त्यांची संख्या अधिक असते. नोव्हेंबरच्या सुरुवातीला फ्लेमिंगो यायला सुरुवात होते. ते साधारण एप्रिलचा शेवट आणि मे च्या सुरुवातीपर्यंत येथे असतात. यापैकी २० टक्के फ्लेमिंगो हे स्थायी आहेत. तर, सुमारे ८० टक्के फ्लेमिंगो हे कच्छवरून येथे येतात. तेथे थंडी वाढली की, ते येथे स्थलांतरित होतात आणि थंडी कमी झाली की, पुन्हा परततात. दरवर्षी एप्रिलच्या शेवटी ठाणे खाडीकिनारी साधारण ३०-४० हजार फ्लेमिंगो असतात.मात्र, यंदा जास्त म्हणजे सुमारे ५०-६० हजार फ्लेमिंगो ठाणे खाडीकिनारी आहेत, असा अंदाज पक्षिअभ्यासक डॉ. सुधीर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे एरव्ही शिवडी खाडी परिसरातही फ्लेमिंगो पाहायला मिळतात. मात्र, सध्या तेथे शिवडी-न्हावाशेवा लिंकचे काम सुरू असल्याने तेथील फ्लेमिंगो ठाणे खाडीकिनारी आले असावेत, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.दुसरीकडे मोठ्या संख्येने असलेले फ्लेमिंगो पक्षिप्रेमींना पाहता यावे, यासाठी भांडुप पंपिंग स्टेशन येथून सुटणाºया बोटीला वनविभागाने परवानगी दिली आहे.  १५ सीटर बोट असून गेल्या आठवड्यापासून ती सुरू झाली आहे आणि विशेष म्हणजे याला पक्षिप्रेमींचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच आणखी दोन फेरीबोटी सुरू करण्याची शक्यता आहे.