शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगसाठी पाच वृक्षांवर कुऱ्हाड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:53 IST

मीरा रोडमधील प्रकार; उद्यान अधीक्षकांवर कारवाईची मागणी

मीरा रोड : मीरा रोडच्या एका गृहनिर्माण संस्थेच्या आवारात असलेली सुमारे ४० फूट उंचीची पाच हिरवीगार झाडे तोडल्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. धडधाकट असलेली ही झाडे धोकादायक ठरवून पार्किंगसाठी महापालिकेच्या संगनमताने तोडल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका नीला सोन्स आणि नगरसेवक विजय राय यांनी केला आहे. याप्रकरणी उद्यान अधीक्षक नागेश वीरकर यांच्यासह संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.मीरा रोडच्या हाटकेश भागातील जीसीसी क्लबजवळ सेंट फ्रान्सिस ही गृहनिर्माण संस्था आहे. या संस्थेने १५ एप्रिलला महापालिकेस त्यांच्या आवारातील चार पॅल्ट्राफारम आणि एक बदामाचे अशी पाच झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती. ही झाडे किंवा त्यांच्या फांद्या पडून जीवितहानीची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच पार्किंगसाठी अडथळा ठरत असल्याचेही नमूद केले होते. दरम्यान, एका क्लबच्या पार्किंगसाठी ही वृक्षतोड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.झाडे तोडण्याचा प्रस्ताव आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष बालाजी खतगावकर यांनी १३ जूनला मंजूर केला. त्यानंतर, त्याच दिवशी वीरकर यांनी गृहनिर्माण संस्थेला पत्र देऊन २५ हजार इतकी अनामत रक्कम कार्यालयात भरून २५ झाडे लावून ती जगवल्याचे निदर्शनास आणल्यावर अनामत रक्कम परत केली जाईल, असे कळवले. संस्थेने पालिका अधिकाऱ्याने सुचवलेल्या ठेकेदाराकडून ही झाडे पूर्णत: कापून टाकली. झाडे तोडल्याने त्यावरील पक्ष्यांची घरटीही नष्ट झाली. हा प्रकार नगरसेविका नीला सोन्स व नगरसेवक विजय राय यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली. ही झाडे ३० ते ४० फूट उंच आणि धडधाकट असताना तसेच कोणत्याही विकासकामांत अडथळा नसताना उद्यान अधीक्षक वीरकर यांनी सोेसायटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संगनमताने जागा मोकळी करण्यासाठी झाडांची कत्तल केल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे....तर न्यायालयात धाव घेणार!पालिका अधिकाºयांनी तुमचीही दिशाभूल केली असल्याचे सांगत वीरकर आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा, अन्यथा तुमच्याविरोधात सरकार आणि उच्च न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही राय व सोन्स यांनी दिला आहे. वीरकर यांनी झाडे धोकादायक होती आणि नगरसेवक राय यांना वस्तुस्थिती समजावली आहे, असे सांगितले.