शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका उभारणार हिरानंदानी भागात पाच टन क्षमतेचे बायोमिथेनेशन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:57 IST

ठाणे महापालिकेने कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया करुन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पाच - पाच टन क्षमतेचे प्रकल्प हिरानंदानी इस्टेट येथे उभारले जाणार आहेत.

ठळक मुद्देया प्रकल्पासाठी २५०० स्क्वेअर मीटर जागा उपलब्ध होणारबायो कंपोस्टींग, बायोमिथेनायझेशन प्रकल्प राबविणार

ठाणे - ओला आणि सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील गृहसंकुलाना आवाहन केले आहे. परंतु पालिकेने सुध्दा या संदर्भात पावले उचलली असून त्यानुसार घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागात ५ टन क्षमतेचे बायोमिथेनेशन व बायो कंपोस्टींग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या ठिकाणी रिटेनिंग वॉल उभारण्यात येणार असून यासाठी येणाºया खर्चाचा प्रस्ताव येत्या १९ सप्टेंबरच्या महासभेत प्रशासनाने पटलावर ठेवला आहे.                    ठाणे महापालिका क्षेत्रात होणाऱ्या  कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने ठाणे शहरात रोज निर्माण होणारा ओला व सुका कचरा विल्हेवाटीसंदर्भात विभागाने कालबध्द कृतीआराखडा उच्च न्यायालयात सादर केला आहे. शहरात आजच्या घडीला प्रतिदिन ४२५ मेट्रीक टन ओला कचरा व ३७५ मेट्रीक टन सुका कचऱ्याची निर्मिती होत आहे. त्यानुसार ओला कचरा विल्हेवाटीसाठी मिश्र पध्दतीची आखणी पालिकेने केली आहे. त्यानुसार बायो कंपोस्टींग, बायोमिथेनायझेशन व मॅकेनिकल कंपोस्टींगच्या माध्यमातून स्थानिकरित्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.त्यानुसार निर्माण होणाऱ्या  कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट विकेंद्रीत पध्दतीने करण्यासाठी ५ -५ टन क्षमतेचे बायोमिथेन गॅस व बायोकंपोस्टीगंचे प्रकल्प उभारण्यास महासभेने सुध्दा मान्यता दिली आहे. तर या प्रकल्पासाठी रोमा बिल्डरने पालिकेला २५०० स्क्वेअर मीटर जागा दिली आहे. ही जागा खाडीकिनारी असल्याने या जागेवर २.५ मीटर पाणी साचणार आहे व प्रकल्प ४ महिने पाण्याखाली असणार आहे. ही बाब विचारात घेऊन २५०० स्क्वेअर मीटर जागेवर रिटेंनिग वॉल बांधून २.५ मीटर उंची वाढविण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार यासाठी ७३ लाख २२ हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdumpingकचरा