शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांसाठी पाच हजार किलोंचा द्राक्ष महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 02:07 IST

सलग चार दिवस चालणार खरेदी

- सुरेश लोखंडेठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत श्री संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत ठाणे शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात ११ फेब्रुवारी म्हणजे गुरुवारपासून पुढील चार दिवस चार हजार ८०० किलो ताजे, गोड द्राक्षे महोत्सव शेतकऱ्यांद्वारे पार पडणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी ‘लोकमत’ला दिली.ठाणेकरांना सेंद्रिय पालेभाज्या, फळफळावळांची मोठी आवड आहे. ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत श्री संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत ठाणे शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात सतत चार दिवस द्राक्ष महोत्सव चालणार आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे पुरवठा होण्यासाठी शासनाच्या रयत बाजार अभियानात इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींनी उत्पादित केलेल्या ताज्या व दर्जेदार पाच हजार किलो द्राक्षांचा महोत्सव ठाणेकरांसाठी ठाणे महानगरपालिका परिसरातील आठवडी बाजारात सुरू होत आहे. गुरुवारपासून सुरू होणारा हा महोत्सव प्रथम शिवाईनगर, ब्रह्मांड, जांभळी, कोलबाड, लोकमान्यनगर व वसंत विहारजवळील खेवरा सर्कल आदी परिसरात पार पडेल.नाशिक येथील आत्माचे प्रकल्प संचालक यांच्याकडील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उत्पादित होणाऱ्या द्राक्षांची विक्री करण्याची संधी मिळणार आहे. द्राक्ष खरेदी करून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.चोखंदळ ठाणेकरांसाठी द्राक्षमहोत्सवठाणे : चोखंदळ ठाणेकरांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलावपाळी या ठिकाणासह ठाणे मनपा मैदान, डवलेनगर टीएमटी बस डेपोमागे लोकमान्यनगर पाडा नं. ३, याशिवाय ब्रह्मांड ठामपा मैदान कोलशेत फेज नं. ५, पातलीपाडा लिंक रोड, ब्रह्मांड, उन्नती गार्डन मैदान, शिवाईनगर, पोखरण रोड नं. १, महानगरपालिका भाजी मंडई, एसआरए इमारतीच्या गेटमधील मोकळी जागा, खेवरा सर्कल, पोखरण रोड नं २, कोलबाड येथील जागमाता मंदिर आणि सृष्टी बिल्डिंगमधील रस्त्याची मोकळी जागा, ठामपा मैदान कोलबाड तलावाच्या जवळ आदी ठिकाणी हा द्राक्षेमहोत्सव पार पडणार आहे.शेतकरी गटांकडून द्राक्षांची उपलब्धतामल्हार ॲग्री फार्मर बोपेगाव, ता. दिंडोरी येथून रोज एक हजार किलो द्राक्षे उपलब्ध होणार आहेत. याप्रमाणेच पराशर कृषी विकास खेडगाव येथून ५०० किलो, श्रीशक्ती महिला शेतकरी गट, खेडगाव तर ऋणानुबंध महिला स्वयंसहाय्यता, मातेरेवाडी, एकता शेतकरी बचतगट, बोपेगाव, कृषी लक्ष्मी आणि रुद्रादित्य फार्मर आदींकडून रोज २०० ते ५०० किलो द्राक्षांचा ताजा माल ठाणेकरांसाठी उपलब्ध केला जाणार आहे.