शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेचे पाच सुरक्षारक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:56 IST

महापालिकेच्या सहायक आयुक्तांना शिवीगाळ होत असताना बघ्याची भूमिका घेतल्याने पाच सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

उल्हासनगर : महापालिकेच्या सहायक आयुक्तांना शिवीगाळ होत असताना बघ्याची भूमिका घेतल्याने पाच सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारपूर्वी सुरक्षारक्षकांचे निलंबन मागे घ्या, नाहीतर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार संघटनेने पालिकेला दिला आहे.उल्हासनगर महापालिकेने शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केल्याने भूमाफिया व स्थानिक नगरसेवकांचे धाबे दणाणले होते. मंगळवारी कारवाईचा अहवाल देण्यासाठी महापालिका मुख्यालयात आलेले सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना एका मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केली. यावेळी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांपैकी बाजीराव जाधव, ज्ञानेश्वर पवार, रमेश पवार, शांताराम दिघे, विनोद झोनवाल व दिनेश रिसवाल आदींनी मनसे पदाधिकाºयाला अटकाव करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली, असा ठपका ठेवून २४ तासांची कारणे दाखवा नोटीस बजावली. सहापैकी पाच सुरक्षकांनी नोटिशीला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, असा ठपका ठेवून त्यांच्याविरोधात निलंबित कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षारक्षकांना या प्रकारात जाणीवपूर्वक निलंबित केल्याचा आरोप कामगार संघटनेचे नेते दिलीप थोरात यांनी केला. वरिष्ठ अधिकांऱ्यांची त्यांनी भेट घेत मंगळवारपूर्वी सुरक्षारक्षकांचे निलंबन मागे घेण्याचा इशारा दिला. अन्यथा महापालिकेविरोधात आंदोलन करावे लागणार असल्याचे संकेत दिले.‘प्रभारी मुकादमावर कारवाई करा’महापालिकेने सफाई कामगारांमधील काही जणांची प्रभारी मुकादमपदी नियुक्ती केली आहे. प्रभारी मुकादमांच्या प्रभागांत बेकायदा बांधकामे फोफावली आहेत. यातूनच शिंपी यांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला. प्रभारी मुकादम व त्यांच्या प्रभागांची चौकशी करून बेकायदा बांधकामे झाल्याचे उघड झाले तर, त्यांच्यावर सक्त कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे शहर संघटक मैन्नुद्दिन शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे.गणेश शिंपी यांनी शुक्रवारी आकाश कॉलनीतील रुंदीकरणाआड येणारी अनेक घरे जमीनदोस्त केली आहेत. या वेळी माजी महापौर पाटील यांच्या कंपाउंडची भिंतही पाडण्यात आली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर