शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख परवडणारी घरे

By admin | Updated: September 4, 2015 01:07 IST

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेबाबत शासनपातळीवर जोरदार हालचाली सुरू असून येत्या आॅक्टोबरपर्यंत याबाबतचे धोरण निश्चित करण्यात येणार

ठाणे : धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेबाबत शासनपातळीवर जोरदार हालचाली सुरू असून येत्या आॅक्टोबरपर्यंत याबाबतचे धोरण निश्चित करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे गृहनिर्माण, खणीकर्म व कामगारमंत्री प्रकाश महेता यांनी ठाण्यात दिली. पंतप्रधान योजनेंतर्गत मुंबईत ११ लाख, ठाण्यात ५ लाख तर संपूर्ण राज्यात २५ लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. धोकादायक इमारतींमधील भाडेकरूंच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना या विषयावर आयोजित मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नौपाड्यातील वसंतराव नाईक सभागृहात ठाणे डिस्ट्रीक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘मी भाडेकरू म्हणूनच जन्माला आलो. ती इमारतही धोकादायक झाल्याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून पर्यायी जागेत राहत आहे,’ असे महेता यांनी सांगितले. धोकादायक इमारतींमधील पाणी आणि वीज खंडित करता येणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.भाडेकरू आणि मालकी तत्त्वाच्या इमारतींसंदर्भात पुनर्विकासाचे धोरण निश्चित करताना रस्त्यासाठी नऊ मीटरपेक्षा जास्त जागा सोडण्याचा प्रस्ताव चुकून मांडला गेला, असे महेता यांनी सांगितले. असे जर झाले तर पुनर्वसन होणार नाही. त्यामुळे एखाद्या इमारतीचा पुनर्विकास करताना रस्त्यासाठी नऊ मीटर जागा सोडण्याची गरज नसल्याचेही त्यांनी रहिवाशांच्या वतीने आमदार केळकर यांच्या मागणीला उत्तर देताना सांगितले. तत्पूर्वी, आमदार केळकर यांनी ठाणेकरांची बाजू मांडली. भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष आमदार संजय केळकर, ठाणे डिस्ट्रीक्ट को-आॅपरेटीव्ह हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे महापालिकेचे भाजपचे गटनेते संजय वाघुले यांच्यासह ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील शेकडो रहिवासी या वेळी उपस्थित होते. ठाण्याला क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी कोणतीच अडचण नसून त्यासाठी पुनर्विकासासाठी चार एफएसआय वाढीव देण्याची सरकारची तयारी असल्याचे महेता म्हणाले. विकासक, भाडेकरू आणि मालक यांचाही या योजनेत फायदा होणार आहे. हे धोरण स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.एखादी इमारत पडल्यानंतर जीव जातात म्हणून न्यायालयाने पोलिसांना अशा इमारती रिक्त करण्याचे आदेश दिले. परंतु, घराबाहेर काढलेल्या रहिवाशांचे काय करायचे, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. त्यामुळे आता भाडेकरू आणि मालकी तत्त्वाच्या इमारतींसंदर्भात पुनर्विकासाचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)