शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या पोटात पाच किलोचा गोळा

By admin | Updated: February 6, 2017 02:44 IST

मुंबईतील ३९ वर्षीय महिलेच्या ओटीपोटातील चरबीचा भाग वाढल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही काळाने ही चरबी नसून, फायब्रॉइड असल्याचे निदान झाले

मुंबई : मुंबईतील ३९ वर्षीय महिलेच्या ओटीपोटातील चरबीचा भाग वाढल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही काळाने ही चरबी नसून, फायब्रॉइड असल्याचे निदान झाले, हा फायब्रॉइड तिच्या आतड्यात वाढत होता. ही बाब डॉक्टरांच्या वेळीच लक्षात आल्याने, त्या महिलेवर शस्त्रक्रिया करून ५.५ किलो वजनाचा फायब्रॉइड काढून, तिच्यावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अंशुमाला शुक्ल आणि शल्यविशारद डॉ.जयदीप घोलप यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.युटेरिन लायोमायोमाटाला ‘युटेरिन फायब्रॉइड’ म्हणून ओळखले जाते. त्याची सुुरुवात स्नायूंपासून होते आणि त्याचे गट बनू लागतात. ३५ वर्षांवरील महिलांमध्ये २०-३० टक्के इतक्या प्रमाणात फायब्रॉइड दिसून येतात. आधुनिक जीवनशैली आणि पुढे ढकलण्यात येणारे प्रजननाचे निर्णय, यामुळे हे प्रमाण हल्ली वाढत आहे, तसेच या फायब्रॉइडचे सहजासहजी निदान होत नाही. कारण ते गर्भाशयाच्या बाजूला लागून वाढतात. तर या फायब्रॉइडमुळे वेदना आणि ओटीपोटात अस्वस्थ वाटते, परंतु काही वेळा त्याची काहीही लक्षणे दिसत नाही. ते अगदी अपघाताने सापडतात.या महिलेच्या ओटीपोटात कठीण चरबी असल्याचे आढळले, परंतु कुठल्याही तपासणीत विचित्र फायब्रॉइडसारखे काहीही आढळले नाही. त्यानंतर, आणखी बारीक तपासणी केल्यानंतर १२ बाय १३ सेंटिमीटर आकाराचा फायब्रॉइड त्यांच्या मोठ्या आतड्यात दिसला. लेप्रोस्कोपिक पद्धतीने फायब्रॉइड आणि गर्भाशय काढून टाकायचा निर्णय घेतला, परंतु आतड्यातून होणारा असामान्य रक्तपुरवठा पाहता, ओपन सर्जरीचा निर्णय घेण्यात आल्याचे रोबोटिक सर्जन आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अंशुमाला शुक्ल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)