शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच नगरसेवकांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:35 IST

विविध तक्रारी : अनेक वर्षांपासून प्रकरणे प्रलंबित, आज सुनावणी

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या तक्रारींवर सुनावणीसाठी महापालिका प्रशासनाला तब्बल ११ महिन्यांनी १५ फेब्रुवारीचा मुहूर्त मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून पालिकेने नगरसेवकांना पाठीशी घालण्यासाठी सुनावणीचा निव्वळ फार्स चालवला आहे. याशिवाय, अनधिकृत बांधकामाच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्या भाजपच्या सात नगरसेविकांविरुद्ध नव्याने तक्रार दाखल झाली असून, तिची पहिली सुनावणीही शनिवारीच ठेवण्यात आली आहे. नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासमोर ही सुनावणी होईल.

भाजप नगरसेविका मेघना रावल, नीला सोन्स, विजय राय आणि परशुराम म्हात्रे तसेच शिवसेना नगरसेविका अनिता पाटील यांच्याविरोधातील तक्रारींवर शनिवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे. याशिवाय, शांतीपार्कमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईत अडथळा आणणाºया भाजपच्या सात नगरसेवकांविरुद्ध संतोष बाणावलीकर यांनी केलेल्या तक्रारीवरही यावेळी सुनावणी होणार आहे. काँग्रेस नगरसेवक नरेश पाटील यांच्याविरोधातील तक्रारदार बाहेरगावी असल्याने ती नंतर घेतली जाईल. अपक्ष नगरसेवक राजीव मेहरा यांच्याविरोधातील तक्रारीची सुनावणी अगोदरच झालेली आहे.

मीरा रोडच्या साईबाबानगर येथे नगरसेविका मेघना यांचे पती दीपक यांनी अनधिकृत बांधकाम केले म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तक्रार इरबा कोनापुरे यांनी केली. दोन वर्षांपासून सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेस प्रशासन पाठीशी घालत असल्याने कोनापुरे यांनी संताप व्यक्त केला. भाजप नगरसेविका नीला सोन्स आणि विजय राय यांनी कनकिया भागात अनधिकृत कार्यालय, वाचनालय बांधल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी ब्रिजेश शर्मा व रोलन मिरांडा यांनी केली आहे. याबाबतच्या गेल्या सुनावणीलादेखील नगरसेवकांनी दांडी मारली होती.पेणकरपाडा येथील सरकारी जमिनीवर अनधिकृत पक्ष कार्यालयाचे बांधकाम केल्याची तक्रार करून भारत मोकल यांनी केली असून, भाजपचे नगरसेवक परशुराम म्हात्रे व शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील यांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस समर्थक नगरसेवक राजीव मेहरा यांनी माहिती लपवल्याने त्यांच्याविरुद्ध पराभूत उमेदवार साबीर शेख यांनी तक्रार केली होती.प्रशासन दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोपशांतीपार्कमधील गोकुळ व्हिलेजच्या भूखंडावर केलेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने नोटीस बजावली असता, भाजपचे त्या प्रभागातील नगरसेवक प्रशांत दळवी, दीपिका अरोरा, आनंद मांजरेकर आणि हेमा बेलानींसह उपमहापौर चंद्रकांत वैती, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, सुरेश खंडेलवाल यांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन करत उपायुक्तांना घेराव घातला. कारवाईस विरोध दर्शवत त्यांनी दमदाटी करत, आत्मदहनाचा इशाराही दिला. तरीही, या चारही नगरसेवकांनी पाठीशी घालत कोणतीही कारवाई केली नसल्याची तक्रार संतोष बाणावलीकर यांनी केली होती. त्यावर सुनावणीचा मुहूर्तदेखील पालिकेला मिळाला आहे.