शहरं
Join us  
Trending Stories
1
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
2
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
3
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
4
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
5
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
6
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
7
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
8
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
9
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
10
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
11
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
12
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
13
सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
14
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
15
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
16
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
17
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
18
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
19
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
20
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव

यंदाही मच्छिमारांची घरे धोक्यात

By admin | Updated: June 20, 2016 01:55 IST

सातपाटीच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांना संरक्षण देणारा बंधारा मागील ७-८ वर्षांपासून फुटला असून त्याच्या दुरुस्तीच्या निधीचा प्रस्ताव मागील

हितेन नाईक,  पालघरसातपाटीच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांना संरक्षण देणारा बंधारा मागील ७-८ वर्षांपासून फुटला असून त्याच्या दुरुस्तीच्या निधीचा प्रस्ताव मागील २-३ वर्षापासून धूळखात पडून आहे. त्यामुळे या पावसाळयातही किनाऱ्यांलगतच्या घरांना उधाणाच्या लाटाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा १४ कोटी पैकी ५ कोटीच्या पहिल्या टप्प्याच्या निधीचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पडून आहे.सातपाटी गावाच्या पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या मच्छिमारांची अनेक घरे समुद्राला आलेल्या तुफानी वादळ वारे आणि भयंकर लाटांच्या तडाख्याने उध्वस्त झाली होती. सहकारी संस्थांच्या मागणीवरून तत्कालीन केंद्रिय पेट्रोलियम मंत्री व बिहारचे विद्यमान राज्यपाल राम नाईक यांच्या प्रयत्नाने सोळाशे मीटर बंधाऱ्याला मान्यता मिळून २ फेब्रुवारी २००३ साली हा बंधारा लोकार्पित करण्यात आला होता. मागील १३ वर्षा पासून ऊन, पाऊस, वादळी वारे आणि महाकाय लाटांचे तडाखे झेलीत हा बंधारा उभा असून त्याची आता पडझड झाली आहे. या बंधाऱ्याचे दगड समुद्रात वाहून गेल्याने बंधाऱ्या ला भगदाडे पडली आहेत. तर बंधाऱ्या वरून खाली उतरण्या साठी बांधण्यात आलेले रॅम्प (पायऱ्या) तुटल्याने महिला वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र गवितांनी मेरी टाईम बोर्डाकडून निधी आणून दुरुस्तीच्या कामाला सुरुवातही केली होती. त्या नंतर काही दिवसात पुन्हा हे काम बंद पडले ते आजपर्यंत बंदच आहे. त्या नंतर बंधाऱ्याच्या दुरुस्तीची अनेक आश्वासने निवडणूकी पूर्वी सातपाटीकरांनी ऐकली असून हि आश्वासने हवेत विरल्याचा अनुभव त्यांनी घेतला आहे.महाराष्ट्र शासनाकडून या जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि वसई तालुक्यातील कळंब (दीड कोटी), अर्नाळा (दीड कोटी), सातपाटी (पाच कोटी), नवापूर(दीड कोटी), तारापूर (दोन कोटी), घिवली(दीड कोटी), एडवन (दीड कोट), डहाणू-बुरुज पाडा(दीड कोटी), गुंगवाडा (दीड कोटी), तडीयाळे (दीड कोटी), धाकटी डहाणू (एक कोटी), नरपड (एक कोटी), ई, १२ बंधाऱ्या च्या कामाचे निधी चे प्रस्ताव तांत्रिक मान्यते साठी सरकार दरबारी पडून आहेत.त्यातील धाकटी डहाणू आणि नरपड ह्या आमदार अमित घोडा यांच्या तालुक्यातील कामाचे टेंडर होऊन कामाची वर्क आॅर्डर मिळाल्याची माहिती पतन विभागाच्या कार्यालयातुन मिळाली आहे. सातपाटी सह बाकीच्या किनारपट्टी वरील लोकांच्या घरांना समुद्राच्या महाकाय लाटा धडका देत असल्याने या कामाची वर्कआॅर्डर निघणे अत्यावश्यक असताना ही बाब धूळ खात का पडून आहेत असा प्रश्न मच्छीमार विचारू लागले आहेत.