शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात मच्छीमारांचा वाद मिटला

By admin | Updated: November 24, 2015 01:37 IST

पारंपरिक आणि मिनी पर्ससीन मच्छीमार यांच्यात मच्छीमारी वरून झालेल्या वादावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जसा यशस्वी तोडगा काढला तसा

पालघर : पारंपरिक आणि मिनी पर्ससीन मच्छीमार यांच्यात मच्छीमारी वरून झालेल्या वादावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जसा यशस्वी तोडगा काढला तसा तो वसई-पालघरमधील मच्छीमारांच्या बाबतीत पालकमंत्री सवरा कधी काढणार असा प्रश्न मच्छीमारांत निर्माण झाला आहे. पारंपरिक मच्छीमारांनी ५ नॉटीकल मैलापर्यंत तर मिनी पर्ससीनधारकांनी ५ ते १२ नॉटीकल मैलापर्यंतच्या सागरीक्षेत्रात मच्छीमार करण्याची मर्यादा शनिवारी पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आखून दिली. या निर्णयास पारंपरिक व पर्ससीन मच्छीमारांनी संमती दर्शविली असून या निर्णयामुळे शांततेचे व सलोख्याचे वातावरण निर्माण होणार असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातही स्थानिक मच्छीमारांमध्ये मासेमारी व्यवसायावरून वाद निर्माण झाला होता. पारंपरिक मच्छीमार व पर्ससीन यांच्यात उद्रेक निर्माण होऊन वातावरण तंग झाले होते. जाळपोळ यासारख्या घटनादेखील घडल्या होत्या. या वादावर तोडगा काढण्यासाठी मच्छीमारांची शनिवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बैठक आयोजित केली होती.या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, पारंपरिक व मिनी पर्ससीन मच्छीमारांचे प्रतिनिधी, सरपंच, मत्स्य विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, आचरा गावात उद्रेक झाला होता. या उद्रेकावर मार्ग काढण्याची व आचरा गावात शांती, गावपण टिकविले जावे यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. आचरा गावात १८ मिनी पर्ससीन मिच्छमार तर १६० पारंपरिक मच्छीमार आहेत. त्यांनी समुद्रात किती अंतरापर्यंत मच्छीमारी करावी यासाठी निर्बंध आखून देण्यात आले. जी तप्तरता पालकमंत्री केसरकर आणि खासदार विनाय राऊत यांनी दाखविली ती तत्परता पालकमंत्री विष्णू सवरा आणि खासदार चिंतामण वनगा कधी दाखविणार असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांत चर्चिला जात आहे.वादावर काढलेला पर्याय यशस्वी झाल्यास जिल्हयÞात इतर ठिकाणीही असेच वाद मिटविले जातील. सध्या पालघर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पर्ससीन, पारंपरिक, यांत्रिकी व परराज्यातील पर्ससीनधारकांमध्ये मासेमारीवरून वाद सुरु आहेत. या वादावरही कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार आहे. वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन कायद्याचा अंमल होईल यादृष्टीने तोडगा काढला जाणार आहे. (प्रतिनिधी)