शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या वाढवण बंदराविरोधात मच्छीमारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 23:47 IST

खासगी उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मच्छीमारांच्या मुळावर उठणारा हा वाढवण बंदर प्रकल्प कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार मच्छीमार आंदोलकांनी बोलून दाखवला.

मीरा रोड : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विरोधात भाईंदरमधील मच्छीमारांनी केंद्र सरकारचा निषेध करत मंगळवारी आंदोलन केले व बंद पाळला. खासगी उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मच्छीमारांच्या मुळावर उठणारा हा वाढवण बंदर प्रकल्प कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार मच्छीमार आंदोलकांनी बोलून दाखवला.समुद्रकिनाऱ्यावरील भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक येथील मच्छीमारांनी बंद पुकारला होता. त्यामुळे या परिसरातील सर्व व्यवहार बंद होते. मच्छीमार आणि कोळी महिला काळे झेंडे आणि केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन आंदोलनात उतरले होते. राज्य सरकार वाढवण बंदराला विरोध करत असताना केंद्राने मात्र ५० टक्के खासगी भागीदारीतून प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाला मच्छीमारांसह शेतकऱ्यांचाही गेल्या १९ वर्षांपासून विरोध सुरू आहे. परंतु मच्छीमार व शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मर्जीतील उद्योगपतींना आंदण देण्यासाठी वाढवण प्रकल्पाचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी चौक मच्छीमार संस्थेचे जॉर्जी गोविंद यांनी केला.मच्छीमार नेते लिओ कोलासो म्हणाले की, वाढवण बंदर ही तर कोळ्यांचे समुद्रकिनारे आणि बंदर गिळंकृत करण्याची ही केंद्राची सुरुवात आहे. स्वाभिमान आणि सन्मानाने जगणाऱ्या मच्छीमारांना उद्योगपतींच्या जंजाळात अडकवून देशोधडीला लावण्याचा हा केंद्र सरकारचा डाव असल्याचा घणाघात कोलासो यांनी केला .बंदर झाल्यावर मोठी जहाजे येतील आणि मासेमारीवर संक्रांत येईल. मोठ्या जहाजांमुळे मासेमारी करता येणार नाही. मोठ्या जहाजांमुळे मच्छीमारांच्या लहान बोटींना अपघाताचा धोका निर्माण होऊन आपल्याला मासेमारी करता येणार नाही, असा आरोप विल्यम गोविंद यांनी केला.